जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज वाटपास सुरुवातवाढीव कर्ज नाही,
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीक कर्ज वाटपास सुरुवातवाढीव कर्ज नाही,
----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
----------------------------------------
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके कडून सेवा सहकारी सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास सुरुवात करण्यात आली आहे परंतु यावर्षी मात्र जेवढा भरणा केला तेवढेच कर्ज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे .
पीक कर्ज वाटपाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सेवा सहकारी सोसायट्या मार्फत शेतकऱ्यांना पीक कर्ज दिल्या जाते 31 मार्च पूर्वी पीक कर्जाचा भरणा केलेल्या नियमित खातेदार शेतकऱ्यांना 29 एप्रिल रोजी पीक कर्ज वाटप करण्यात आले एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये प्रमाणे पीक कर्ज वाटप करण्यात आले नियमित खातेदार शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचा भरणा केला होता तेवढेच पीक कर्ज मिळाले आहे इतर राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रमाणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अल्प प्रमाणात पीक कर्ज वाटप करण्यात येते यावर्षी मात्र पीक कर्जामध्ये वाढ करण्यात आली नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केल्या जात आहे 31 मार्च पूर्वी पीक कर्जाचा भरणा केलेले शेतकरी नियमित कर्जदार म्हणून ठरविले जातात 31 मार्च नंतर पीक कर्जाचा भरणा केलेले शेतकरी थकीत कर्जदार म्हणून ठरविले जातात तसेच त्यांना व्याजाची सुद्धा आकारणी केल्या जाते व तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात जून पर्यंत पीक कर्ज वाटप केल्या जाते 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते म्हणून यावर्षी काही शेतकऱ्यांनी 31 मार्च ऐवजी 30 एप्रिल ही कर्ज भरण्याची मुदत करावी अशी मागणी केली होती दरवर्षी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकरी सर्वात जास्त पीक कर्ज घेतात तसेच दरवर्षी शेतकऱ्यांना दहा ते वीस टक्के वाढीव कर्ज पुरवठा केल्या जातो परंतु यावर्षी जेवढा कर्जाचा भरणा केला तेवढेच कर्ज मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment