शेतातून पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर चोरणारे चोरट्यास अटक.

शेतातून पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर चोरणारे चोरट्यास अटक.

चोरीचे वाहन व गुन्हा करणे करीता वापरले वाहनासह एकूण 7, 25,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !

दि.14.04.2024 ते 15.04.2024 रोजी सायंकाळी सात ते सकाळी 06.30 वा. चे मुदतीत महेश शिवगोंडा पाटील, व.व. 28, रा. हालसवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांचे मालकीचा व्हीएसटी शक्ती 130 डीआय कंपनीचा पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर हा त्यांचे हालसवडे येथील जमीन गट नं. 80 मधील ऊसाचे शेतातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली 

पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करुन नमुद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. सदरचे ठिकाण हे फिर्यादी यांचे शेतात निर्जनस्थळी असून तपास पथकाने गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा घडलेची पध्दत तसेच तांत्रिक दृष्ट्या माहिती घेवून तपास करीत असताना नमुद तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रविण पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सचिन काकासो पाटील, रा. हालस्वडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर याने केला असुन तो सदर गुन्ह्यातील चोरलेला पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर त्याचे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडी नं. एमएच-09-एफएल-8529 मध्ये ठेवून कागल ते मुरगूड जाणारे रोडवरून पिंपळगाव येथे त्याच्या मामाचे गावी जाणार आहे.


मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार तपास पथकाने कागल ते मुरगूड जाणारे रोडवर असले पाटबंधारे कार्यालयासमोर साध्या वेषात सापळा लावून आरोपी सचिन काकासो पाटील, व.व. 28, रा. हालसवडे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास दि.18.04.2024 रोजी त्याचे मालकीचे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडी नं.एमएच-09-एफएल-8529 सह पकडून सदर पिकअपची पाहणी केली असता पिकअप मध्ये मागील बाजूस लाल रंगाचा पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर मिळून आला. सदर पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर बाबत सचिन पाटील याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने गोकूळ शिरगांव पोलीस ठाणे, गु.र.नं. 134/2024, भा.द.वि.स.क.379 प्रमाणे दाखल गुन्हा केला असलेची माहिती सांगून त्याचे कब्जात असलेला पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर हा सदर चोरीतील असून सदरचा गुन्हा करणे करीता त्याने त्याचे महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप गाडीचा वापर केला असलेची हकीकत सांगितली. आरोपीचे कब्जातून चोरीतील पॉवर ट्रेलर ट्रॅक्टर व चोरी करणेकरीता वापरलेली महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप असा एकूण 7,25,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई करीता गोकूळ शिरगांव पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास गोकूळ शिरगांव पोलीस ठाणे करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.