काळजवडेच्या एकास तीन दिवसांची पोलीस कोठडी विवाहितेवर अत्याचार.
--------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
पन्हाळा-प्रतिनिधी
आशिष पाटील
--------------------------
विवाहितेच्या घरातील लोकांना ठार मारण्याची धमकी देवून तिचा विवस्त्र व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शहाजी भिकाजी कांबळे (रा.काळजवडे ता.पन्हाळा) याच्यावर कळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करुन कळे-खेरीवडे न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.
याबाबत संबंधित महिलेने कळे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दि.१९ जानेवारी २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत फिर्यादी महिलेच्या घराजवळील शेतामध्ये संशयित शहाजी याने तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान कळे पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक रणजीत पाटील यांनी संशीयतास अटक केली.
0 Comments