भारतीय जनता पक्षाचा पराभव हाच एकमेव महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा अजेंडा :-- शिरोली येथे निर्धार मेळावा.
भारतीय जनता पक्षाचा पराभव हाच एकमेव महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचा अजेंडा :-- शिरोली येथे निर्धार मेळावा.
----------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
----------------------------
प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपण उमेदवार आहे असे समजून घराघरात चिन्ह पोहचवण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारात पुलाची शिरोलीत आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व आमदार राजूबाबा आवळे, डॉ. सजित मिणचेकर, राजीव आवळे, संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले हातकणंगले मतदार संघाने गेल्या दहा वर्षात जे उमेदवार निवडून दिले. त्यांनी कोणता विकास केला हे मतदार संघात शोधावे लागेल .उलट भाजपच्या सरकारने जीएसटी सारखा अन्यायी कर लागू करून सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांची लूट केली आहे. अशा भाजपच्या महायुतीचा पराभव करण्यासाठी
महाविकास आघाडी उबाठा पक्षाचे उमेदवार हे साखर कारखानदार नसून एक सर्वसामान्य शेतकरी आहेत. तसेच त्यांची प्रतिमा स्वच्छ व निष्कलंक असल्यामुळे सत्यजीत पाटील हे प्रचंड मताधिक्याने विजय होतील.यामध्ये वाळवा शिराळा मतदार संघाचे लिड हे इतर तालुक्यापेक्षा निश्चितच जास्त असेल असा जयंत पाटील यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले हातकणंगले लोकसभा मतदारसं घातील सत्यजीत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच मतदार संघात विचारांचा वनवा पेटला आहे. आणि तो वनवा येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तेवत राहील. महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या गादीचा सन्मान राखला पण साताऱ्यातील अवस्था काय आहे हे जनता पाहत आहे. असा उपरोधिकपणे भाजपवर हल्ला केला. काँग्रेसचा जाहीरनामा हा देशातील सर्वच घटकांना अत्यंत लाभदायक असा आहे अन्यायकारक जीएसटी कर प्रणाली रद्द केली जाणार आहे. नोकरीमध्ये महिलांना ५० टक्के संधी तसेच अन्य महत्त्वकांक्षी योजना काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात स्पष्ट केल्या आहेत. भारतीय जनता पक्षावर बोलताना ते म्हणाले पक्ष फोडणारे, चिन्ह चोरणारे एका बाजूला तर देशाची अस्मिता जपणारे दुसऱ्या बाजूला असा विरोधाभास सध्या महाराष्ट्रात पर्यायाने देशात पहावयास मिळत आहे. या फोडाफोडीच्या भाजपच्या राजकारणाला जनता येत्या लोकसभा निवडणुकीत जशास तसे मतपेटीतून उत्तर देईल असा सतेज पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांना मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले.
सत्यजित पाटील म्हणाले गेल्या पंधरा वर्षात आपण सर्वांनी या मतदारसंघातील उमेदवाराला प्रामाणिक मतदान केले पण फळ मिळाले नाही उलट अपेक्षा भंग झाला आहे. त्यामुळे सर्वच घटक अडचणीत आहेत.तसेच पक्ष संपवण्याचे भाजपचे धोरण मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजय करा व आपली सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.
शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी शिवसेना उबाठा पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा समाचार घेताना माने हे गद्दार उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सत्यजित पाटील हे खुद्दार उमेदवार आहेत. त्यामुळे तुम्हाला खुद्दार हवा आहे, की गद्दार ? असा सवाल उपस्थित करून सत्यजीत पाटील यांना प्रचंड मताने विजय करण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे यांनी संविधान वाचवण्याचे काम करणाऱ्या महाविकास व इंडिया आघाडीला मतदान करायचे की दुसरीकडे संविधान संपवण्याचे व हुकूमशाही प्रस्थापित करणाऱ्या भाजपला? याचा फैसला मतदारांनी करावा असे आवाहन केले.
माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले हातकणंगले तालुक्यातील आम्ही तिघे आजी माजी आमदार महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी जीवाचे रान करू. तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सत्यजीत पाटलांना ५० हजाराचे मताधिक्य देऊ असे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार राजू किसन आवळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भगवान जाधव ,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनिल चौगुले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले आदींची भाषणे झाली. सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनि केले
या मेळाव्यास रोहित पाटील,सर्जेराव माने,प्रतिक पाटील, बी.के.चव्हाण, साताप्पा भवान, बाजीराव पाटील,शशिकांत खवरे, तानाजी पाटील, उत्तम सावंत,विवेक नागववकर , भिकाजी सावंत ,अभिनंदन सोळाकुरे ,प्रकाश झिरंगे, अनिल खवरे, चेतन चव्हाण,अँड. राजवर्धन पाटील,उत्तम पाटील, बाजीराव सातपुते,राजकुमार पाटील,प्रल्हाद खोत, अशोक खोत यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment