खून करून पळून गेलेल्या आरोपीला लोणंद पोलिसांनी घेतले एका तासाच्या आत ताब्यात.

 खून करून पळून गेलेल्या आरोपीला लोणंद पोलिसांनी घेतले एका तासाच्या आत ताब्यात.

-----------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कराड प्रतिनिधी  

वैभव शिंदे 

-------------------------------------------------------

          निघृण खून करून पळून गेलेल्या आरोपीला लोणंद पोलिसांनी एका तासाच्या आत घेतले ताब्यात. दि. 2/4/2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याचे सुमारास आदर्की खु. ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीत हा गुन्हा झाला असल्याचे निष्पन्न झाले. 

              त्याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्व वैमनस्यातून हा खून झाला असल्याचे उघड झाले आहे दि. 2/4/2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजण्याची सुमारास आदर्की खुर्द गावचे हद्दीत चिंचेचा माळा नावाचे शिवारात चंद्रशेखर भगवानराव निंबाळकर वय 48 वर्षे रा. आदरकी ता. फलटण यांनी सयाजी शंकर निंबाळकर आदरकी खुर्द फलटण यांची शेतात बांधावरून बोरवेल ची मशीन व पिकअप जीप नेऊन बांध खराब केल्याच्या राग मनात धरून आरोपी सयाजी शंकर निंबाळकर यांनी चंद्रशेखर निंबाळकर यांचे डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून गंभीर जखमी करून खून केला.

         त्यानुसार फिर्यादी ही मयताचा मुलगा चैतन्य चंद्रशेखर निंबाळकर याने लोणंद पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.

        त्यानुसार समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, ऑचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांना सदर घटनेबाबत माहीती दिली असता त्यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुशिल बो. भोसले, तपास सुरु केला. आदर्की बु. व आदर्की खुर्द गावातील लोकांना ग्रामसुरक्षा यंत्राणा यावर आरोपी सयाजी शंकर निंबाळकर रा. आदर्की खुर्द ता. फलटण याचा शोध घेणेकामी सुचना दिल्या. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण भाग हे घटनास्थळी दाखल झाले त्याचे मार्गदर्शनाखाली आरोपी हा अदरकी गावात चिचंचामळा नावचे शिवारात ओठ्या जवळ असले बाबत बातमीदाराचे मार्फत माहीती मिळाल्याने आदर्की खुर्द गावातील ग्रामस्थ व पोलीस स्टाफ यांचे मदतीने आरोपीस सापळा रचुन पकडुन त्याला गुन्हयाचे कामी अटक केली. सदर आरोपीस मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण न्यायालय हजर ठेवुन त्याची पोलीस कोठडीची मागणी केली असता सदर आरोपीस दिनांक 8/4/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सुशिल भोसले हे करीत आहेत.

        समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक, राहुल रा.धस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल वी भासान सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिवाजी काटे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, नितीन भासल, नाना भिस, चंद्रकात काकडे, विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, बापू मदने, सतिश दडस, सिध्देश्वर वाघमोडे, चालक संजय चव्हाण यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतला आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.