जि प शाळा नावली ची नवोदय मध्ये यशाची परंपरा कायम.

 जि प शाळा नावली ची नवोदय मध्ये यशाची परंपरा कायम.  

----------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर  

----------------------------

  अशोक अंभोरे सरांच्या अथक परिश्रमाला यश.                            रिसोड तालुक्यातील नामांकित असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावली ही शाळा गुणवत्तेच्या प्रमाणात अतिशय उत्कृष्ट असून या शाळेमधील दरवर्षी जवाहर नवोदय साठी बरेच विद्यार्थ्यांची निवड होत असते, त्याचप्रमाणे याही वर्षी ही परंपरा अशोक अंभोरे सर व त्यांच्या सहकारी शिक्षक वृंदांनी  कायम ठेवली यावर्षी या शाळेचे चार विद्यार्थी नवोदयसाठी पात्र ठरले त्यामध्ये विपुल देशमुख ,आरव साळवे ,आदर्श अंभोरे, ज्ञानेश्वर बाजड, हे चार विद्यार्थी वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले, रिसोड तालुक्यातील नावली येथील जिल्हा परिषद शाळा पटसंख्या खूप चांगली आहे, येथील शिक्षक नवोदय मध्ये विद्यार्थी लागण्यासाठी त्यांच्याकडून आठ ते बारा तासापर्यंत चांगलीच चांगली मेहनत घेऊन अभ्यास करून घेतात ,त्यामुळे या शाळेकडे परिसरातील विद्यार्थ्यांचा सुद्धा चांगला कल आहे, सदर विद्यार्थ्यांची नवोदय मध्ये निवड होण्यासाठी अशोक अंभोरे सर यांनी वर्षभर केलेल्या परिश्रमाला अखेर फळ मिळाले  असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये व परिसरात त्यांच्या कार्याचे समाधान व्यक्त होत आहे ,अंभोरे सरांच्या मेहनतीचे परिसरात व गावातील पालक वर्गात समाधान व्यक्त केला जात आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निवडीचे श्रेय आपल्या शिक्षकांना व आई वडील यांना दिले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.