लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी .. मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी गजाआड.

 लोणंद पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी .. मोटरसायकल चोरी करणारी सराईत टोळी गजाआड.

---------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

लोणंद प्रतिनिधी

---------------------------

मोटार सायकली चोरी करणा-या टोळीच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या. 

      याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद पोलीस ठाणे हददीतील लोणंद ता. खंडाळा गावातुन मोटार सायकली चोरीचे गुन्हे दाखल झालेले होते. सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मा.अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हयाचे तपासात वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री. सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले.

        दिनांक २३/०४/२०२४ रोजी यातील दोन आरोपीचा ठावठिकाण मिळताच मा. वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील दोन आरोपी ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदारांनी मिळून लोणंद गावचे हद्दीतील दोन मोटार सायकली चोरी केलेची कबुली दिली आहे. आरोपी नामे १) सचिन दादु पोटोळे वय २० वर्षे रा. दरुज ता. खटाव जि. सातारा २) अशोक शंकर पाटोळे वय २० वर्षे रा. दरुज ता. खटाव जि. सातारा ३) अनिकेत रमेश जाधव १९ रा. दरजाई ता. खटाव जि. सातारा. आरोपींकडून चोरी केलेल्या दोन मोटार सायकली व गुन्हा करतेवेळी वापरलेली एक स्प्लेंडर मोटरसायकल अशा तीन मोटार सायकली एकुण २,२०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

     सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे, तसेच सपोफ. पाडवी, पोहवा. नाना भिसे, विजय पिसाळ, बापुराव मदने, सिध्देश्वर वाघमोडे, अभिजित घनवट यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.