Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे वादळी वारे व पावसाच्या तडाक्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान.

 सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे वादळी वारे व पावसाच्या तडाक्यामुळे  मोठ्या प्रमाणात नुकसान.

-----------------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी 

विजय कांबळे

-----------------------------------------------

करवीर तालुक्यातील सांगवडे येथे  कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या प्राथमिक शाळेचे काल संध्याकाळी झालेल्या वादळी वारे व पावसाच्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शाळेतील चार वर्गाच्या खोलीवरचे पत्रे उडून गेले त्यामुळे शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. शाळेत झालेल्या नुकसानाची माहिती कळताच सांगवडे गावचे सरपंच सौ. रूपाली कुंभार, ग्रामसेविका सारिका बंडगर, श्री विजय यादव (गट विकास अधिकारी पं.स.करवीर), श्री अमोल पाटील ( समग्र शिक्षण विभाग कार्यकारी अभियंता), श्री. चौधरी( शिक्षण विभाग बांधकाम). श्री संतोष पाटील( झोनल अधिकारी).ग्रा.पं.सदस्य श्री शितल भेंडवडे ,बाजीराव देसाई, उत्तम कुंभार, ग्रामपंचायतचे लिपिक अरुण सोनवणे, शालेय व्यवस्था समिती अध्यक्ष श्री अरुण जाधव, मुख्याध्यापिका सौ उमा साळुखे , व सर्व शिक्षकवृंद, माजी मुख्याध्यापक कोळी सर तसेच सांगवडे गावातील नागरिक यांनी देखील शाळेची झालेल्या नुकसानाची  आज पाहणी केली. या सर्व शाळेच्या खोल्या लोकसभा मतदान केंद्र क्रमांक 291/ 992 / 993 मतदान केंद्राच्या असून या लवकरात लवकर दुरुस्त करण्याची ग्वाही वरील सर्व अधिकाऱ्यांनी दिली तसेच शाळेसमोर असणाऱ्या विक्रम पाटील यांच्या घरावर झाड कोसळून  किरकोळ नुकसान झाले.

या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे सांगवडे गावातील माळभाग विद्युत पुरवठा पूर्णतः बंद आहे.

 न्यूज साठी सांगवडे प्रतिनिधी विजय कांबळे

Post a Comment

0 Comments