बच्चू कडू चा महायुतीवर प्रहार हातकणंगले मध्ये करणार राजू शेट्टींचा प्रचार.
बच्चू कडू चा महायुतीवर प्रहार हातकणंगले मध्ये करणार राजू शेट्टींचा प्रचार.
----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मिरज कुपवाड प्रतिनिधी
राजू कदम
---------------------------------
बच्चू कडू यांनी अमरावती महायुतीच्या विरोधात भूमिका घेत प्रहार पक्षाकडून दिनेश बुक यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता बच्चू कडू हे पुन्हा एकदा महायुतीविरोधात दंड थोपटण्याचा तयारीत आहेत ते आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघ माहितीच्या उमेदवार विरोधात राजू शेट्टी यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे
या संदर्भ एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी माहिती दिले बच्चू कडू म्हणाले राजू शेट्टी हे चळवळीतील नेते आहेत ते शेतकऱ्यांसाठी लढणारे एक योद्धा आहे ज्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो त्याचप्रमाणे राजू शेट्टी काम करतात मला माहिती आहे की हातकणंगले मध्ये दोन्ही मराठा समाजाचे नेते उभे आहेत मात्र जातीच्या पलीकडे जाऊन आमचं नातं शेतकऱ्यांशी जोडले गेले आहे ते नातं आम्ही टिकू आणि राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली मी हातकणंगलेमध्ये प्रचार करण्यासाठी कधी जाईन हे अध्यापन निश्चित नाही कार्यकर्त्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल पण एक संपूर्ण दिवस राजू शेट्टी यांचा प्रचारासाठी जाणार आहे हे निश्चित आहे या संदर्भ राजू शेट्टी यांच्याशी बोलणे झाले आहे अशी माहिती त्यांनी दिली
Comments
Post a Comment