छ.संभाजीनगर येथे "एक मुठ धान्य पक्ष्यांसाठी" कार्यक्रमाचे आयोजन.
-----------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत.ठाकूर
-----------------------------
छ.संभाजीनगर. ग्रहांची उत्पत्ति व त्यांचे आस्तित्व या संदर्भात आतापर्यंतच्या झालेल्या संशोधनानुसार असा निष्कर्ष काढण्यात आला की,ब्रम्हांडामध्ये सजीव सृष्टी असणारा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी होय. जेव्हा-केव्हा सजिव सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा जन्मजात प्रत्येक सजीवाला त्याच्या आस्तित्वानुसार जगण्याचा अधिकार निसर्गाकडून प्रदान करण्यात आला. पण मानवाच्या स्वार्थी व अति प्रगल्भ बुध्दीमत्तेमुळे व हव्या तश्या सुख- सुविधा उपलब्ध करून घेण्याच्या हव्यासा पोटी वृक्ष व पशु- पक्ष्यांच्या अनेक प्रजाती लुप्त झाल्या,ह्यात तिळमात्र शंका नाही.आणि यापुढे असेच मानवी धोरण कायम राहिल्यास मानवाचे अस्तित्व सुद्धा संपुष्ठात येईल हि काळ्या दगडावरील रेघ आहे.असे मत छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त गजानन मुलंगे ह्यांनी छ.संभाजीनगर स्थित नक्षत्रवाडी येथे सौ.पुष्पा सुरेश मुंगसे यांच्या राहत्या घरी "एक मुठ धान्य पक्ष्यांसाठी" कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता डॉ.राजेशराव पुराणिक मुख्य मार्गदर्शक जल व भुमि व्यवस्थापन संस्था छ.संभाजीनगर, राधिका राऊत मुख्याध्यापिका संत एकनाथ महाराज विद्यालय पैठण, तंत्रस्नेही सुवर्णा मुंगसे, शिक्षक गुणवंत थोरात प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अतिथींचे स्वागत करण्यात आले तद्नंतर झाडांना टांगलेल्या खापरी येळण्यामध्ये प्रमुख अतिथीच्या हस्ते पक्ष्यांसाठी पाणी भरून बाजूला ठेवलेल्या पृष्ठावर एक मुठ मिश्रित धान्य टाकण्यात आले.वृक्षप्रेमी अविनाश मुंगसे ह्यांनी सदर्हु ठिकाणी संवर्धित केलेल्या सीताफळ, रामफळ, बोरं, जांभूळ, पपई, बेल, खजुर, चिकू,आंबा इतकेचं नव्हे तर वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या कडुनिंबाच्या झाडाचे निरिक्षण करतांना पुराणिक म्हणाले की, प्रत्येक घरमालकाने खुल्या जागेचे क्षेत्रफळ व वृक्षांची व्याप्ती विचारात घेत वृक्ष लागवड करून पशु-पक्षी तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांना अभय दान द्यावे तसेच मानवी शरीराला घातक असणार्या बाजारातील पावडर युक्त फळापासून अलिप्त राहून रोगमुक्त जीवन यापन करावे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लता केदारे,मनिषा खंडागळे,मुक्ता गायके, सिमा कोठाळे,अनिता शिंदे,अरुण साळवे ईत्यादिंनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments