Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

परराज्यातील मोटर सायकल चोरट्यास अटक.

 परराज्यातील मोटर सायकल चोरट्यास अटक.

-------------------------------- 

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

------------------------------- 

6,80,000/- रूपये किंमतीच्या 17 मोटर सायकल जप्त !!

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्यानं वाढत असल असल्याने पोलीस अधीक्षक यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव, शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व सागर माने यांना पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आवन्ना उर्फ रवी चंदरगी, रा. गोकाक, जि. बेळगाव, राज्य-कर्नाटक हा चोरीतील स्प्लेंडर मोटर सायकल घेवून दि. 22.04.2024 रोजी गडहिंग्लज ते संकेश्वर जाणारे रोडवरील निलजी फाटा येथील बसस्टॉपवर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती


मिळाले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि. 22.04.2024 रोजी सापळा लावून आरोपी आवन्ना उर्फ रवी उध्दाप्पा चंदरगी, व. व.50, रा. बेटगेरी, ता. गोकाक, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक यास नंबर प्लेट नसलेल्या काळे रंगाचे स्प्लेंडर मोटर सायकलसह ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचे कब्जात असलेली स्प्लेंडर मोटर सायकल ही चोरीची असून सदर बाबत लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, गु.र.नं.196/2024, भा.दं.वि.सं.कलम-379 प्रमाणे गुन्हा दाखल असलेची माहिती मिळाली. म्हणून त्यास सदर गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले. सदरचा आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याचेकडे कौशल्यपूर्ण अधिक तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यासह एकूण 17 मोटर सायकल चोरीचे गुन्हे केलेची कबुली दिली.

सदर आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण 6,80,000/- रुपये किंमतीच्या 17 मोटर सायकली हस्तगत केल्या असून आरोपीकडून उघडकीस आले गुन्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे-


अ. नं. पोलीस ठाणे 01 लक्ष्मीपुरी गुन्हा रजि नंबर 269/2024 गुन्हा रजि नंबर अ.नं. पोलीस ठाणे ठ 8 g 8 8 8 8 8 8 588/2023 10 शाहुपूरी 02 03 लक्ष्मीपुरी लक्ष्मीपुरी 114/2024 11 जुना राजवाडा 821 / 2023 196/2024 12 जुना राजवाडा 304/2024 04 शाहुपूरी 829/2023 13 जुना राजवाडा 308/2024 05 शाहुपूरी 831/2023 14 राजारामपुरी 533/2023 06 शाहुपूरी 1166/2023 15 इचलकरंजी 119/2024 07 शाहुपूरी 1171/2023 16 मिरज शहर 49/2024 08 शाहुपूरी शाहुपूरी 1197 / 2023 17 हुक्केरी (कर्नाटक) 62/2024 158/2024 09


सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्री. संदिप जाधव, श्री. शेष मोरे तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील, सागर माने, रामचंद्र कोळी, महेश खोत, संजय इंगवले, संजय कुंभार, राजेश राठोड, समीर कांबळे, राजू कांबळे, शिवानंद मठपती, संजय पडवळ, संतोष पाटील, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर व यशवंत कुंभार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments