भारतीय जनता पक्षाचा पराभव करा प्रा - नितीन बानूगडे पाटील.
--------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
----------------------------
उद्योग गुजरातला पळून महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोजगार बनवणाऱ्या भारतीय जनता पक्ष व महायुतीचा पराभव करा. असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले. ते पुलाची शिरोलीत महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर माजी सरपंच शशिकांत खवरे, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, पंचायत समिती माजी सदस्य अनिल खवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले 20 24 ची लोकसभा निवडणुक ही नेत्यांची निवडणूक नसून लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मतदाराने आपल्या भारताचा नागरिक हा सुसंस्कृत बनवायचा आहे की गुलाम बनवायचा आहे याचा फैसला करण्याची आवश्यकता आहे.भारतीय जनता पक्ष हा भांडवलदारांचा पक्ष आहे. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता तर देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ही आर्थिक राजधानी खिळखिळी करण्याचे पाप भाजपाने केले आहे. मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला स्थलांतरित केले यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार बनले आहेत. त्यांच्या तोंडातला घास पळविण्याचे महापाप भाजपाने केले आहे .हेच भाजपचे नेते विकास कामावर न बोलता जागतिक पातळीवरील दाखले देत फिरत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या या दहा वर्षाच्या कालावधीत शेतकरी सुखी नाही, गृहिणी सुखी नाही, तरुण सुखी नाही. उद्योजक सुखी नाही , कामगार, भूमिहीन महागाईने त्रस्त आहेत.तसेच हि निवडणूक गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी होत आहे. त्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक सत्यजित पाटील सरुडकर यांना विजयी करावे असे आवाहन बानगुडे पाटील यांनी केले.
यावेळी बानुगडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते सध्या सुरू असलेल्या भाजपच्या राजकीय खेळ खंडोबाचे परखड मत उदाहरणासह व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजीत मिचेकर,बाजीराव सातपुते, अभिनंदन सोळांकुरे,महेश चव्हाण, अनिल खवरे, संजय चौगले आदींनी मनोगत व्यक्त केले.
यासभेस साताप्पा भवान, बाजीराव पाटील, उत्तम पाटील, राजकुमार पाटील, दिपक खवरे,सरदार मुल्ला, मुकूंद नाळे, हरी पुजारी, संजय शिंदे, जोतिराम पोर्लेकर, दिनकर पाटील, महमद महात, उर्मिला जाधव,अशोक खोत, प्रल्हाद खोत,राहूल खवरे,सुजीत समुद्रे,हारुण सनदे,योगेश चव्हाण, शिवाजी पोवार, ज्ञानदेव करपे, शहाजी चव्हाण, श्रेयस नागावकर , भिकाजी सावंत , विवेक नगावकर , विजय बाचने दीपक लंबे , दिलीप पोवार ,संजय वडार , उमाशंकर कोळी , अशोकराव मगदूम , नितीन दळवी यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन महेश चव्हाण यांनीकेले तर आभार सुरेश यादव यांनी मानले.
0 Comments