Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

 ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

----------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

---------------------------- 

प्रजापीता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोड सेवा केंद्राचा चोविसावा वर्धापनदिन 24 एप्रिल बुधवारला उत्साहात साजरा करण्यात आला. रिसोड सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी ज्योती दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माउंट अबू राजस्थान येथे मुख्यालय असलेल्या ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राची शाखा रिसोड शहरात चोवीस वर्षापूर्वी सुरु करण्यात आली होती तेव्हापासून संचालिका ज्योती दिदी निरंतर ईश्वरीय संदेश देण्याची सेवा करित आहेत. अतिशय परिश्रमाने, आत्मविश्वासाने या सेंटरच्या विकासासाठी ज्योती दिदी नी मार्गक्रमण केले.अकोला वाशीम सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका राजायोगिनी ब्रह्माकुमारी रुख्मिनी दिदी व सुमन दिदी यांचे नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्यामुळे रिसोड येथे सेवा करणे सहज शक्य झाल्याचे मनोगत ज्योती दीदींनी प्रसंगी व्यक्त केले.वर्धापन दिनाच्या निमित्ताने संचालिका ज्योती दिदी व सहसंचालिका गीता दिदी यांचे सेवा केंद्राच्या सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिणीच्या वतीने जेष्ठ ज्ञानार्थी पुष्पा बहन कोठारी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.दीदींच्या हस्ते केक कापून सेवा केंद्राचा वर्धापन दिवस साजरा केला.संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदींनी ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या उन्नतीसाठी तन ळ, मन धनाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व ज्ञानार्थी भाऊ बहिणी सह हितचिंतक, शुभ चिंतक व सहयोगी भाऊ बहिणींचे मनःपूर्वक आभार मानले व सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments