हिंदू मुस्लिम एक्याचे प्रतीक असलेले छञपती शिवाजी चौकातील हजरत सय्यद मुबारक सय्यद घुडणपीर दर्गा यांचा उरूस साजरा करण्यात आला.
सोमावरी di-15-04-24 रोजी संदल पार पडलं आणि काल दी 16-04-24 रोजी गलेफ मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या सुरवातीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अदील फरास आणि शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळ चे अध्यक्ष राजू साळोखे हे उपस्थित होते.
रात्री 9 च्या आस पास अबुल मुजावर यांच्या मार्गदर्शना खाली पारंपरिक वाद्य, बांड,हलगी आणि शहनाई आदीच्या साथीने दर्ग्यातून गलेफ मिरवणुक ला प्रारंभ झाला. गलेफ घेऊन तुळजाभवानी मंदिर जवळ भोसलेवाड्या प्रस्तान केले. येथे भोसले कुटूंबानी स्वागत करून गलेफ पूजन केलं आणि गलेफ दर्ग्यात नेला. मिरवणूक दर्ग्यात आल्या नंतर खादिमानी तूर्बती वर गलेफ चढवत समाजात सुख शांती राहूदे म्हणून दुआ केली.
0 Comments