Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मेढा येथील सुरू झालेल्या बैल बाजारा तील जनावरांसाठी श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री विनोद दादा पार्टे यांस कडून मोफत पाणी वाटप.

 मेढा येथील सुरू झालेल्या बैल बाजारा तील जनावरांसाठी श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री विनोद दादा पार्टे यांस कडून मोफत पाणी वाटप.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मेढा प्रतिनिधी 

शेखर जाधव

------------------------------

 मेढा ता .जावली येथे दोन वर्षाच्या कालखंडानंतर बैल बाजारास सुरुवात.

:-- मेढा ता .जावली येथे दोन वर्षाच्या कालखंडानंतर बैल बाजारास सुरुवात दि.1/4/024.मेढा येथील जनावरांचा वार्षिक बैल बाजार रंगपंचमीला सुरू होऊन तो पाडव्याला संपतो. परंतु, गेली दोन वर्षे जनावरांच्या लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला होता. हा बैल बाजार दि. 1/4/24 रोजी पासून सुरू झाला असून मोठ्या उलाढालींना सुरुवात झाली आहे. परराज्यातील व्यापारी मेढ्यात येत असल्याने स्थानिकांनाही रोजगार निर्माण झाला आहे.विविध जातीचे बैल, खोंड कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून विक्रीसाठी या बाजारात दाखल झाले आहे. बाजार मोठा असल्याने याशिवाय बालगोपाळांसाठी पाळणे, खेळण्याची दुकाने, दावण, कासरे, घुंगरु, ऊसाची गुन्हाळे, हॉटेल यांचे रेलचेल बाजारात सुरू झाली आहे. पाडव्यापर्यंत शहरात जत्रेचा हंगाम राहणार आहे. नागरिकांच्या मनोरंजनासाठी नामवंत तमाशाचे फड व चित्रपटांच्या टुरिंग टॉकीज या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येतात.सालाबादप्रमाणे बाजारासाठी दिवाबत्ती महावितरण करते. पिण्याच्या पाण्याची सोय.मा.समाजसेवक. श्री. विनोद दादा पार्टे. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पुरवते.

बाजार समितीच्या वतीने व पंचायत समिती जावली,नगरपंचायत मेढा,पशुवैधकिय आधिकारी जावली यांच्या वतीने सर्व नियोजन करण्यात आलेली आहे. तसेच जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जनावरांना लसीकरण करणे, पायांच्या नख्यांना पोटॅशियमचा वापर करणे यासारख्या सुविधा पुरवून लाळ खुरकत रोगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी बैल व शेती उपयोगी साहित्य खरेदी-विक्रीसाठी सहभागी होऊन या बैलबाजाराची शोभा वाढवावी, असे आवाहन सभापती जयदीप शिंदे यांनी केले आहे.तसेच आजच्या बैलबाजारच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर‌.सभापती.श्री जयदीप शिंदे,मा.सभापती.श्री.राजेंद्र शिंदे,समाजसेवक. श्री.विनोद दादा पार्टे,श्री. हनुमंत शिंगटे, श्री ‌.मनेश फरांदे,श्री.तुकाराम शिंदे, सौ.कमल दळवी,श्री. सचिन करंजेकर,श्री.शंकर खामकर,सचिव.श्री. महेश देशमुख,श्री.राजेंद्र कोकरे,श्री.संजय शिंदे,शेतकरी,व्यापारी,उपस्थित मान्यवर

Post a Comment

0 Comments