लोह्यात भीम जयंती मिरवणूक उत्साहात ; निळ्या कमानीने लोहा नगरी निळी-निळी .

 लोह्यात भीम जयंती मिरवणूक उत्साहात ; निळ्या कमानीने लोहा नगरी निळी-निळी .

------------------------------------
लोहा प्रतिनिधि 
अंबादास पवार 
------------------------------------

     भीम अनुयायी वर्ष भरापासून १४ एप्रिलची आतुरतेने वाट पाहत असतात. भीम जयंती सोहळा म्हणजे निळाईला उधाण येते. शहरात निळ्या कमानी त्यावर पंचरंगी आणि निळे ध्वज त्यामुळे अवघे लोहा शहर हे निळेमय झाले होते. ठिकठिकाणी ध्वजारोहण तर दुपारी सार्वजनिक जयंती मिरवणूक सोहळा साजरा काढण्यात आला. मिरवणुकीत महिलांसह अबालवृद्ध शुभ्र व निळे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. तर बाबासाहेबांच्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 

           लोहा शहरात ठिकठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त रविवारी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी सकाळी डॉ. आंबेडकर नगरातील क्रांतीसुर्य बुद्ध विहार येथील मुख्य ध्वजारोहण पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांच्या हस्ते पंचशील व डॉ. मिलिंद धनसडे यांच्या हस्ते निळा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ज्ञानदीप बुद्ध विहारात ज्ञानोबा हानवते, गंगाराम वाघमारे, इंदिरानगर येथे  माजी नगरसेवक बबन निर्मले, संतराम कांबळे, सिद्धार्थ नगर येथे तुकाराम कापुरे, बाबाराव सोनकांबळे, जायकवाडी येथे बी. बी. गायसमुद्रे, सायाळ रोड येथे प्रा. राजेश ढवळे, जुना लोहा त्रिरत्न बुद्ध विहार 

येथे माजी आ. रोहिदास चव्हाण व माजी उपनगराध्यक्ष शरद पवार, बाळासाहेब कऱ्हाळे, कमलबाई धुतमल यांच्या हस्ते करण्यात आले. बुद्ध पूजा विधी संस्कार भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक धोंडीबा यानभुरे, तालुकाध्यक्ष एस. एन. शिनगारपुतळे, रत्नाकर महाबळे, बापूसाहेब कापुरे यांनी पार पाडला. अभिषेक वस्त्रालयात डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. खांबेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक मुरतुज शेख, हिलाल पाटील, दिनाजी भोळे, हटकर उपस्थित होते.

             जुना लोहा शहरातून दुपारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवछत्रपती विद्यालय, मारोती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नलगे विद्यालय, जामा मस्जिद विठ्ठलवाडी, नागेश्वर मंदिर, भाजी मंडई, पोलिस ठाणे, बसस्थानक मार्गे आंबेडकर नगरातील क्रांतीसुर्य बुद्ध विहारात रात्री साडेनऊ वाजता विसर्जित करण्यात आली. मिरवणुक मार्गावरील पोलिस ठण्यासमोर का. जाधव यांच्या स्मरणार्थ अन्नदान वाटप करण्यात आले. मिरवणुकीत डिजेच्या तालावर तरुणांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी, बाबासाहेबांचा जयजयकार, निळ्या कमानी, झेंडे शहर वशियांचे आकर्षण ठरले. दरम्यान अनेक राजकीय, सामाजिक मान्यवरांनी यांनी मिरवणुकीत सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यामध्ये खा. सुधाकर श्रुंगारे, आ. श्यामसुंदर शिंदे आदींनी हजेरी लावली. सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर महाबळे, बालाजी खिल्लारे, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, बबन निर्मले, उत्तम महाबळे, पंचशील कांबळे, नरसिंग शिंदे, व्ही. के. कांबळे, इ. जे. बनसोडे, सुरेश महाबळे, डी. एन. कांबळे, केतन खिल्लारे, अनिल धुतमल, सिद्धार्थ महाबळे, लखन महाबळे, केतन खिलारे, माजी नगराध्यक्षा त्रिशलाबाई कांबळे, नगरसेविका राहीबाई खिल्लारे, माजी नगरसेविका पुष्पलता कापुरे, जळूबाई भोळे, आंबूबाई महाबळे, मथुराबाई महाबळे सुनंदाबाई कापुरे, मंगल धुतमल, शिल्पा धुतमल सह बहुसंख्येने भीम अनुयायी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.