मतदानरुपी संधीचे मतदान करून सोने करा.जालिंदर देवकर समाजसेवक.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
---------------------------------
देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवार 26 एप्रिलला होणार आहे. या टप्प्यात अकोला लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. प्रशासकीय स्तरावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत तसेच विविध सामाजिक संस्था सुद्धा मतदारांना मतदान करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही पन्नास टक्केपेक्षाही कमी आहे आणि ही लोकशाहीला चिंतेत टाकणारी बाब आहे. मतदारांचा हा निरुत्साह देशाच्या विकासासाठी बाधक आणि घातक ठरु शकतो. मतदान करणे हे आपले केवळ कर्तव्यच नव्हे तर तो प्रत्येकाचा संविधानिक अधिकार आहे. या अधिकाराचा उपयोग करून सर्वसामान्य माणसाने मिळालेल्या संधीचे सोनं कराव आणि आपल्या देशाप्रती आपल योगदान द्यावं असे आवाहन रिसोड शहरातील व्यावसायिक तथा समाजसेवक जालिंदर देवकर यांनी केले आहे.
0 Comments