Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मराठी शाळा टिकवणे ही आपली जबाबदारी : वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे.

 मराठी शाळा टिकवणे ही आपली जबाबदारी : वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे.

------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील

-----------------------------

मजरे कार्वे येथील मराठी शाळेत ग्रंथालय-प्रयोगशाळेचे उद्घाटन.

          मराठी शाळा टिकवणे ही आपली जबाबदारी असून त्यासाठी आपणच प्रयत्न पुढाकार घेऊन मुलांना मराठीची गोडी लावणे आवश्यक असल्याचे मत वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी व्यक्त केले. शनिवारी मजरे कारवे येथील केंद्रीय मराठी शाळेत ग्रंथालय-प्रयोगशाळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री हारकारे होत्या. 

दुर्गवीर संदीप गावडे यांनीही गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनाचे विवेचन केले. यावेळी देणगीदार माजी सरपंच शिवाजी तुपारे, विमल तुपारे, शालन बोकडे, संपदा तुपारे, दत्तात्रय पाटील, उत्तम हारकारे, प्रकाश उपाध्ये, केंद्रप्रमुख बाळू प्रधान, शिवानी राजदीप, अनुराधा पाटील, विजया पोवार, मावजीभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वनरक्षक मेघराज हुल्ले, रावळेवाड, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अंकुश बोकडे, निंगाप्पा बोकडे, तेजस्विनी पोपकर, मनिषा पाटील, ज्योती कांबळे, संगिता जळगेकर, नेहा पाटील उपस्थित होते. मुख्याध्यापक जोतिबा पाटील यांनी सूत्रसंचलन केले तर सुजाता कांबळे यांनी आभार मानले.


तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते नूतन खोलीचे व जिन्याचे उद्घाटन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments