Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वादळी पावसाच्या तडाक्यामुळे सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान.

 वादळी पावसाच्या तडाक्यामुळे सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

हुपरी प्रतिनिधी 

 जितेंद्र जाधव 

-------------------------------

करवीर तालुक्यातील सांगवडे येथे वादळी वाऱ्याच्या पावसाच्या तडाख्यामुळे कै. शामराव खंडेराव मोहिते विद्या मंदिर सांगवडे या प्राथमिक शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शाळेच्या वर्गाच्या खोलीवरचे पत्रे उडून गेलेत तसेच शाळेसमोर असणाऱ्या पिकप शेड वरील पत्रे उडून गेलेत त्यामुळे शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले .

 शाळेत झालेल्या नुकसानाची माहिती कळताच शिक्षक आशिष कांबळे सर व कोळी सर तसेच सांगवडे चे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सनी काशींबरे तसेच सांगवडे चे माजी सरपंच अशोक तिरपणकर गावातील नागरिक यांनी देखील शाळेची झालेल्या नुकसानाची पाहणी केली तसेच शाळेसमोर असणाऱ्या विक्रम पाटील यांच्या घरावर झाड कोसळून किरकोळ नुकसान झाले.

या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे सांगवडे गावातील विद्युत पुरवठा कोणता पूर्णतः बंद होता.

लाईट नसल्यामुळे उद्या सकाळी विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व भागातील सर्व नागरिक उद्या शाळेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल अशी ग्वाही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सनी काशींबरे यांनी शिक्षकांना दिली

Post a Comment

0 Comments