Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गडहिंग्लज पोलीस ठाण्यात लाच घेताना महिला हेड कॉन्स्टेबल ताब्यात.

 गडहिंग्लज पोलीस ठाण्यात लाच घेताना महिला हेड कॉन्स्टेबल ताब्यात.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार

--------------------------------

गडहिंग्लज : - गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा नोंद असून तक्रारदार व त्यांच्या पत्नीवर प्रतिबंधक कारवाई करत नाही असे सांगून लोकसेवक महिला हेड कॉन्स्टेबल रेखा भैरू लोहार यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयाची मागणी केली होती 

त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाशी संपर्क साधून घडलेल्या घटनेचा वृत्तांत कथन केला केलेल्या कथनानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गडहिंग्लज पोलीस ठाण्यात महिला हेड कॉन्स्टेबल रेखा भैरू लोहार यांच्यावर पाळत ठेवून दोन हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले 

सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक असिम मुल्ला सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश भंडारे अजय चव्हाण सुधीर पाटील पूनम पाटील यांनी केली.

Post a Comment

0 Comments