वळिवडेची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा बुधवार, ता. ३ पासून सुरु, विविध स्पर्धा, करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन.
वळिवडेची श्री विठ्ठल बिरदेव यात्रा बुधवार, ता. ३ पासून सुरु, विविध स्पर्धा, करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-------------------------------
गांधीनगर, ता. २ः वळिवडे (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल बिरदेव यात्रा बुधवार, ता. ३ पासून सुरु होत असून रविवार, ता. ९ पर्यंत धार्मिक विधी विविध स्पर्धा, करमणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ही माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष भगवान पळसे, संजय कावले यांनी दिली. आचारसंहितेचे कडक पालन केले जाणार असून यात्रेला गालबोट लागणारे कृत्य केल्यास कडक कारवाई करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच रुपाली रणजीतसिंह कुसाळे आणि उपसरपंच सुभाष इंगवले उपस्थित होते.
बुधवार, ता. ३ रोजी रांगोळी, धावणे, सायकल, हातगाडा, पोत्यात पाय घालून धावणे, चौकोन डान्स, संगीत खुर्ची अशा स्पर्धा आहेत. त्यानंतर श्रींची मानाची पहिली पालखी निघणार आहे. यादिवशी ऑर्केस्ट्रा आकाश हा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, ता. ४ रोजी मुलींच्या धावणे स्पर्धा, म्हैस सजविणे, बैल सजविणे, स्लो सायकल, रिव्हर्स रिक्षा, रेडकू पळविणे, म्हैस पळविणे, वक्तृत्व स्पर्धा आणि होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे. यानंतर श्रींची मानाची दुसरी पालखी निघणार आहे. यादिवशी राधा पाटील यांचा लावणी शो हा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार, ता. ५ रोजी यात्रेचा मुख्य तिसरा दिवस असून यादिवशी हलगी वादन, धनगरी ढोल वादन स्पर्धा होणार आहेत. यानंतर श्रींची पालखी देव जळास जाणे हा मुख्य धार्मिक विधी होणार असून यावेळी बँडपथक, लाईट शो, लेझर शो, धनगरी ढोल, हिंदी मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि फटाक्यांची भव्य आतषबाजी होणार आहे. शनिवार, ता. ६ रोजी जोर मारणे, बैठक मारणे, श्वान पळवणे, मोटारसायकलबरोबर म्हैस पळविणे, मोटारसायकलबरोबर रेडकू पळविणे या स्पर्धा होणार आहेत. यानंतर श्रींची मानाची चौथी पालखी आणि भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे. यादिवशी मनाली मंडलिक यांचा लावणी शो होणार आहे. रविवार, ता. ९ रोजी सुट्टा घोडा, आदत दुसरा, जनरल घोडागाडी, बैलगाडी, ब गट बैलगाडी या शर्यती होणार आहेत. यादिवशी दुपारी निकाली कुस्त्यांचे मैदान होणार आहे. यानंतर श्रींची मानाची पाचवी पालखी निघणार आहे. सोमवार, ता. १० रोजी हा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमादरम्यान आचारसंहितेचे कडक पालन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार परिषदेला सरपंच रुपाली रणजितसिंह कुसाळे, उपसरपंच सुभाष इंगवले, यात्रा समितीचे अध्यक्ष भगवान पळसे, संजय कावले, उपाध्यक्ष उमेश शिंगे, सेक्रेटरी चंद्रकांत पाटील, दिग्विजय चव्हाण, खजानिस संजय सलगर, सुरज चौगुले आदिंसह यात्रा समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------
Comments
Post a Comment