Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताह.

 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताह.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी

प्रमोद पंडित

----------------------------------

भणंग : - भगवंताचे सगुण साजरे रूप गोजिरे पाहताना अंतकरण सुखी होते . पण हे रूप प्राप्त होण्यासाठी सदविचार हवेत पण संत संगतिशिवाय सद्विचार प्राप्त होत नाहीत . व भगवंताच्या कृपेशिवाय संताची संगती मिळत नाही अशा शाश्वत परमार्थिक सुखासाठी तन मन धनादी सहकार्य करून . लाभ घ्यावा .

गेली अखंडपणे ४o वर्षे हरिनाम सप्ताह साजरा करणारे जावळी तालुक्या भणंग हे पहिलेच गाव . आपल्या ४१ वे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदामिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताह हनुमान जन्मत्सवापासून सुरवात करत आहे .

मंगळवार दिनांक २३ / ० ४ / २०२४ रोजी पहाटे अभिषेक करून काकड आरती करण्यात येणार आहे त्यानंतर हनुमान जन्मउत्सव साजरा करण्यात येणार आहे . त्यानंतर सकाळी ८ ते ११ व दुपारी ३ ते ५ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण (वाचन ) करण्यात येणार आहे . ५ ते ६ या वेळेत प्रवचन होणार आहे सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ होणार रात्री ९ ते ११ किर्तन त्यानंतर सुस्वर भजन जागर .

30 / ४ / २४ रोजी दुपारी १२वा . ह . भ . प प्रविण महाराज शेलार यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर दिंडी सोहळा व महाप्रसाद होणार आहे तरी भणंग पंचक्रोशितील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा

Post a Comment

0 Comments