गांधीनगर मध्ये व्यापाऱ्याला झालेल्या मारहानीतील मुख्य संशयितांच्या मुस्क्या आवळल्या.विशाल पहुजा यास दिल्ली येथे अटक.

 गांधीनगर मध्ये व्यापाऱ्याला झालेल्या मारहानीतील मुख्य संशयितांच्या मुस्क्या आवळल्या.विशाल पहुजा यास दिल्ली येथे अटक.



-------------------------------- 

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------- 

गांधीनगर येथील व्यापारी कैलास गोवालदास कटार यांना 9 एप्रिल रोजी अक्षय चावला, प्रशांत मिसाळ यांच्यासह चार ते पाच जणांनी त्यांच्या मेन रोडवरील पूनम होजिअरी या दुकानांमध्ये घुसून जीवघेणा हल्ला चढवला होता. त्या मारहाणीत कैलास कटार हे गंभीर जखमी झाले होते हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली होता. या घडलेल्या घटनेमुळे गांधीनगर व्यापारामध्ये तीव्र पडसाद उमटले.

 या घटनेतील मुख्य सूत्रधार विशाल पहुजा यांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झुंजुर्के यांनी शुक्रवार रात्री दिल्ली येथे मुस्क्या आवळल्या. मारहाणीचा मुख्य सूत्रधार विशाल पहुजा यास आज कोल्हापुरातील न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली.

करवीर तालुक्यातील गांधीनगर बाजारपेठ परिसरात गुन्हेगारीचे प्रस्थ वाढले होते व्यापाऱ्यांना धमकावणे, व्यापाऱ्यांच्या मुलांना वाम मार्गाला लावून नाजूक संबंधात अडकवून लाखो रुपये उकळणे असे प्रकार वारंवार घडत होते. यातूनच दिवसाढवळ्या घरात घुसून मारहाण करण्याचे प्रकारही वाढले होते. 9 एप्रिल रोजी कैलास कट्यार या व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून अक्षय चावला, प्रशांत उर्फ बाल्या मिसाळ यांच्यासह पाच ते सहा जणांनी दुकानात घुसून कैलास कटार याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. गंभीर कैलास कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी गोवालदास कट्यार यांनी अक्षय चावला, बाल्या मिसाळ याच्याच पाच ते सहा जणांच्या वर गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यापूर्वीही याच लोकांनी कैलास कट्यार यांच्या घरावर हल्ला चढवला होता. त्यावेळी सुद्धा तक्रार दाखल केली होती. पण गांधीनगर मधील युवा कार्यकर्ता विशाल पहुजा याने हल्ला करणारे कार्यकर्ते माझे असून त्यांच्यावर तक्रार देऊ नये असा दबाव निर्माण करून हे प्रकरण मिटवले होते. पुन्हा याच कारणावरून हा जीवघेणा हल्ला झाला होता. यावेळी विशाल पहुजा याची चार चाकी गाडी घटनास्थळी होती. या घटनेनंतर ही पहुजा याने पोलीस ठाण्यामध्ये येऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. पण या घटनेची नोंद झाली होती. चार दिवसांपूर्वी पोलिसांनी या घटनेतील संशयित वेदांग शिवराज पोवार,मयूर महेश सोळंकी,साहिल सायबु कांबळे तिघेही राहणार कोल्हापूर यांना अटक केली होती. या संस्थेच्या कडून युवा कार्यकर्ता विशाल पहुजा याचे नाव झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.पहुजा याचे हॉटेलही पोलिसांनी सील केले होते.स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने शुक्रवारी रात्री विशाल पहुजा याच्या मुस्क्या आवळल्या. या संपूर्ण घटनेचा मुख्य सूत्रधार तोच असल्याची चर्चा समोर येत आहे. विशाल पहुजा याच्यावर यापूर्वी काही गुन्हे आहेत का याचा पोलीस शोध घेत आहेत.त्याला आज कोल्हापुरातील न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.