भेळचे पैसे देण्याच्या कारणातून एक जणांवर चाकू हल्ला.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-------------------------------
दुर्गमानवाड ता.राधानगरी येथे भेळचे पैसे देण्याच्या कारणातून चाकूने भोकसून जखमी केल्याप्रकरणी वडील आणि मुलगा या दोघांवर राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वडील राहुल भोसले व मुलगा राजवीर राहुल भोसले (रा.कोल्हापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबतची फिर्याद जखमी जयसिंग कृष्णाजी पाटील (वय ४१, रा. कसबा तारळे, ता.राधानगरी ) यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी जयसिंग पाटील आणि त्यांचा भाऊ उदय हे दुर्गमानवाड येथे देवदर्शनासाठी गेले होते. दरम्यान, भेळचे पैसे देण्याच्या कारणातून उदय याला भेळ विक्रेता राहुल याने मारहाण केली. यावेळी जयसिंग पाटील यांनी आपल्या भावाला का मारले ? असे विचारले असता भेळ विक्रेत्याचा मुलगा राजवीर याने जयसिंग पाटील यांच्या डोक्यात काठी मारली. त्यानंतर राहुल भोसले याने त्याच्याकडे असलेल्या चाकूने पाटील यांना ठार मारण्याच्या उद्देशाने छातीत डाव्या बाजूला भोकसुन जखमी केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश घेरडीकर, किरण पाटील, प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात खामकर अधिक तपास करीत आहेत.
0 Comments