दोन गटाच्या वर्चस्वातून रंकाळा येथे खून.,आरोपी काही तासातच गजाआड.
दोन गटाच्या वर्चस्वातून रंकाळा येथे खून.,आरोपी काही तासातच गजाआड.
---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------------
दोन गटाच्या वर्चस्वातून रंकाळा परिसरात अजय उर्फ रावण दगडू शिंदे वय वर्ष २५ राहणार डवरी गल्ली वसाहत, यादव नगर कोल्हापूर याचा गुरुवारी आठ जणांनी पाठलाग करूंन धारदार शस्त्रानी वार करून खून केल्याची घटना घडली होती.
या घटनेची अधिक माहिती अशी की.
सदर खूनामधील आरोपी व मयत एकाच ठिकाणी डवरी वसाहत यादव नगर कोल्हापूर सायबर चौकात राहतात.
अजय शिंदे व त्याचे मारेकरी यांच्यात काही दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा वाद मिटवण्याचा आहे, असे सांगून अजय शिंदे यास रंकाळा टॉवर या ठिकाणी बोलावून घेऊन त्याचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची कबुली राज जगताप ,आकाश माळी ,संदीप माळी, रोहित शिंदे ,निलेश माळी, गणेश माळी, प्रशांत शिंदे, निलेश बाबर यांनी दिली.
सदरची कारवाई जुना राजवाडा पोलीस ठाणे व स्थानिक गून्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या काही तासातच या खुनातील आरोपींना अटक केली
Comments
Post a Comment