रिसोड पंचायत समितीच्या कृषी विभागाला आग लागली की लावली?

 रिसोड पंचायत समितीच्या कृषी विभागाला आग लागली की लावली?

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

----------------------------

 वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील पंचायत समितीच्या जुन्या कृषी विभागाच्या इमारतीला 18  एप्रिलच्या रात्री 08:30 वाजताच्या दरम्यान आग लागून या आगीत कृषी संबंधित महत्त्वाचे  कागदपत्रे जळून खाक झाले आहेत.आगीने एवढे रौद्ररूप धारण केले होते, की कृषी विभागाच्या जुन्या कार्यालयातील महत्त्वाचे कागदपत्रे यांच्यासह लोखंडी  फर्निचर सुद्धा जळून खाक झाले आहेत.विशेष म्हणजे कृषी विभागाच्या जुन्या कार्यालयासमोरच जल जीवन मिशनचे कार्यालय असून यामध्ये जल जीवन मिशन संदर्भात महत्त्वाचे कागदपत्रे ठेवलेली आहेत कदाचित कृषी विभागाच्या कार्यालया बरोबरच जल जीवन मिशनचे कार्यालय सुद्धा जाळण्याचा समाजकंटकाचा हेतू तर नसेल ना असे सर्वसामान्य जनतेत बोलल्या जात आहे.कृषी विभागाच्या जुन्या कार्यालयाला आग लागली की लावण्यात आली अशी शंका  वर्तविल्या जात आहे.या संदर्भात रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बदरखे यांनी उदय वार्ताशी बोलताना सांगितले की, जुन्या कृषी विभागातील कागदपत्रे ही कालबाह्य झाले असून 20 वर्षांपूर्वीचे  कागदपत्रे कार्यालयात ठेवण्यातात आले होते त्यामुळे ती कागदपत्रे महत्त्वाचे नव्हते तसेच ही आग विद्युत पुरवठ्याच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे  सांगितले असून याची सविस्तर चौकशी करण्यात येईल असे म्हटले आहे.रिसोड पंचायत समितीचे सभापती प्रतिनिधी दिनकर हाडे  यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलतानाा म्हटले की, कृषी विभागाच्या जुन्या कार्याला आग लागली नसून ती लावण्यात आली आहे कारण कृषी विभागाच्या जुन्या कार्यालयातील कागदपत्रे ही महत्त्वाची नसून या कार्यालयासमोरच जलजीवन मिशनचे कार्यालय असून या कार्यालयामध्ये महत्त्वाचे कागदपत्रे ठेवण्यात आलेली आहेत व काही दिवसापूर्वी जल जीवन मिशनमध्ये लाखोचा भ्रष्टाचार झाला असून तो भ्रष्टाचार लपविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून किंवा समाजकंटकाकडून कृषी विभागाच्या जुन्या कार्यालयाला आग लावली म्हणजे समोरील जलजीवन मिशनचे कार्यालय सुद्धा जळून खाक होईल असा समाजकंटकाचा उद्देश असून त्यांना यामध्ये यश आले नसून फक्त कृषी विभागाचे जुने कार्यालय जळून खाक झाले आहे.तसेच या कार्यालयामध्ये विद्युत पुरवठा बंद असल्याने शॉर्टसर्किटने आग लागली असे म्हणता येणार नाही त्यामुळे या आगीची सखोल चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे 18 एप्रिलच्या रात्री लागलेल्या आगीवर अग्निशामकक दलाने नियंत्रण मिळविले होते परंतु आज 19 एप्रिललाा सकाळी कृषी विभागाच्या जुन्या इमारती मधून आगीच्या धुरा बाहेर येत असल्याने उर्वरित कागदपत्राला सकाळी तर कोणी आग लावली नसेल ना अशी शंका वर्तविल्या जात आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.