राधानगरी तालूक्यातील तिटवे येथे विहीरीत पाय घसरून पङल्याने शेतकर्याचा मुत्यु.
राधानगरी तालूक्यातील तिटवे येथे विहीरीत पाय घसरून पङल्याने शेतकर्याचा मुत्यु.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
----------------------------
शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी जात आसतानां विहीरीत पाय घसरून पङल्याने राजेंद्र बाबूराव पाटील वय 45 रा. तिटवे ता. राधानगरी या शेतकर्याचा दूर्देवी मूत्यू झाला. ही घटना काल रात्री मानकांङ नावाच्या शेतात घङली.त्यांच्या मूत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. तसेच तो स्वाभिमानी दूध ङेअरीचा चेअरमन होता.
राजेंद्र पाटील हे आपल्या मानकांड नावाच्या शेतात ऊसाला पाणी पाजण्यासाठी काल रात्री गेले होते. शुक्रवार ते रविवारी हे तीन दिवस दिवसा लाईट शेती साठी मिळते.गेल्या चार दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने वीज पुरवठा खंडित झाला तो मंगळवार दि.27मे सांय.पाच ते सात या वेळेसाठी वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता शेतात पाणी पाजण्यासाठी गेला होता.यावेळी त्यांच्याच विहीरीत राजेंद्र यांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. राजेंद्र घरी न आल्याने गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली असता तो सापङला नाही. त्याची मोटर सायकल विहीरीजवळ आढळून आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी विहीरीत गळ टाकला असता त्याचा मूतदेह मिळून आला. आज सायंकाळी सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मूतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या आकस्मित जाण्याने कुटुंबातील मोठा आधार गेला आहे. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून त्यांच्या मागे आई,पत्नी,भाऊ, मुलगा, मुलगी,बहीण असा परिवार आहे.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे
Comments
Post a Comment