Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

चिमुकलीच्या उपचारासाठी मिळाले समरजितसिंह घाटगेंचे सहकार्य मदतीबद्दल आभार मानून व्यक्त केली कृतज्ञता.

 चिमुकलीच्या उपचारासाठी मिळाले समरजितसिंह घाटगेंचे सहकार्य मदतीबद्दल आभार मानून व्यक्त केली कृतज्ञता.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगुड,प्रतिनिधी

 जोतीराम कुंभार

---------------------------------------

  समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्न व सहकार्याने सुरुपली (ता.कागल)येथील दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीस ह्दय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक  मदत मिळाली. सृष्टी बाबुराव कुंभार असे तिचे नाव आहे.मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल नातेवाईकांनी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.


  सुरुपली ता. कागल येथील  बाबुराव कुंभार यांची दीड,वर्षाची मुलगी सृष्टीच्या हृदयाला तीन छिद्रे होती.त्यामुळे ती सतत आजारी असायची.बेळगाव येथील  रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी सात लाख रुपये खर्च आला. मुख्यमंत्री सहायता निधीतून या उपचारासाठी शासनाकडून मदत मिळावी.यासाठी त्यांनी श्री घाटगे यांची भेट घेतली.त्यानुसार श्री घाटगे  यांनी पाठपुरावा केला व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाख रुपयांची मदत त्यांच्या खात्यावर जमा झाली.

 या चिमुकलीचे ऑपरेशन झाल्यानंतर आता ती ठणठणीत बरी झाली आहे. आता ती दूडूदूडू धावते,खेळते.तिच्या बाललिलांनी कुंभार कुटुंबीय आनंदीत झाले आहे.मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून दिल्याबद्दल कुंभार कुटुंबीयांनी श्री घाटगे  यांना घरी चहापानासाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार या परिसरात संपर्क दौऱ्याच्या निमित्ताने गेल्यावर श्री घाटगे कुंभार यांच्या घरी गेले. सृष्टीची त्यांनी आपुलकीने विचारपूस केली.

यावेळी केरबा कुंभार मंगल कुंभार संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments