सामाजिक समिक्षा करणारे संपादक रुपेश पाडमुख सर

 सामाजिक समिक्षा करणारे संपादक रुपेश पाडमुख सर.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

------------------------------


प्रसार माध्यम हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन देशातील लोकशाही अधिका अधिकपणे मजबुत करणे समाजातील चालू घडामोडीवर लक्ष ठेवणे ते शासन, प्रशासन व जनतेपुढे आपल्या लेखणीतून समिक्षा करुन रोखठोकपणे मांडणारे समिक्षाचे मुख्य संपादक आमचे मार्गदर्शक मिडिया पोलिस सोशल क्लब चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रूपेश पाडमुख सर यांचा आज वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

 रुपेश पाडमुख सर हे सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात सदा अग्रेसर असुन नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची मोट बांधून त्यांनी म.रा. मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस म्हणून अनेक वर्ष यशस्वीपणे धुरा सांभाळली आहे. म.रा. मराठी पत्रकार संघाचा त्यांनी जिल्ह्यात विस्तार केला आहे. तसेच त्यांनी मिडिया पोलिस सोशल क्लब ची ही स्थापना केली आहे.

 तसेच रूपेश पाडमुख सर हे नांदेड जिल्ह्यातील अग्रणी स्थानिक दैनिक समिक्षाचे मुख्य संपादक आहेत. त्यांनी दैनिक समिक्षा च्या माध्यमातून शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यासह शासन प्रशासन दरबारी उत्कृष्ट वृत्तांकन करुन आपला ठसा उमटविला आहे. तसेच ते दैनिक समिक्षाचा दिवाळी, अंक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयतीचा विशेषांक, आदी दैनिक समिक्षाचे विशेषांक फार दर्जेदार काढतात उत्कृष्ट छपाई करतात.

 तसेच दरवर्षी मिमांसा फाऊंडेशन व दैनिक समिक्षा यांच्या माध्यमातून तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक, विद्यापिठाचे कुलगुरू, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया चे संपादक, पत्रकार यांच्या कार्याची दखल घेऊन ते त्यांना नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात एक शानदार कार्यक्रम घेऊन पुरस्कार देतात स्वादिष्ट व रुचकर स्नेह भोजन देतात.

 तसेच त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांना मोटार सायकलचा प्रवास सुरक्षीत व्हावा म्हणून त्यांनी हेल्मेट वाटप केले.

 तसेच एखाद्या गोरगरीब होतकरू पत्रकारांचे अकाली निधन झाले होते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी सामाजिक दायित्व जोपासत आर्थिक मदत केली.

 जिल्ह्यात कुठे एखाद्या पत्रकारांवर अन्याय झाला तर तिथे ते धावून जातात समोरचा कुणीही कितीही अधिकारी, पदाधिकारी,नेता असो त्यांची परवा न करता पत्रकारांना न्याय मिळवून देतात. ते कधीही पित्त पत्रकारिता करीत नाहीत नेहमी विकासात्मक पत्रकारितेला प्राधान्य देतात परंतु कुठे कुणाचे चुकत असेल तर त्यांना ही ते आपल्या लेखनीच्या माध्यमातून सरळ करतात. त्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांच्या कारभारावर आपल्या लेखनीच्या माध्यमातून ताशेरे ओढून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले.

रूपेश पाडमुख सर यांच्या दैनिकांचे नाव आहे दैनिक वाचकमत समिक्षा असुन ते नेहमी समाजातील चालू घडामोडीची समिक्षा करून सामाजिक समिक्षा करतात.

 आज दि.१६ रोजी त्यांचा वाढदिवस असुन ईश्वर त्यांना चांगले निरोगी व दिर्घ आयुष्य देवो त्यांच्या हातून नियमित जनसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.