Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वादळी वाऱ्यामुळे सौर पॅनेलचे नुकसान.

 वादळी वाऱ्यामुळे सौर पॅनेलचे नुकसान.

------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

 रणजीत ठाकूर. 

------------------------

 वादळी वाऱ्यामुळे चिंचाबा पेन येथील शेतकऱ्याच्या शेतातील सौर पॅनेलचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.


दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्याच्या थैमानामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पीक नुकसानासह काही शेतकऱ्यांच्या शेतातील मालमत्तांनाही हानी पोहोचली. यामध्ये चिंचाबा पेन येथील शेतकरी रामेश्वर बबनराव सरनाईक यांच्या गट क्रमांक 183 मधील विहिरी वर लावलेल्या 5 सौर ऊर्जा पॅनेलचे नुकसान झाले आहे. हे पॅनेल पूर्णपणे तुटले असून, पॅनेल खाली मोडलेल्या अवस्थेत पडलेले आहे. या घटनेची संयुक्तरित्या पाहणी करून तलाठी संजय वियके, कृषी सहाय्यक हनुमान आरु आणि सरपंच शिवाजी खोटे यांनी पंचनामा केला. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी रामेश्वर बबनराव सरनाईक यांनी केली आहे. 


*दैनिक पब्लिक लीडर प्रतिनिधी अजय कानडे*

Post a Comment

0 Comments