भारतीय सैन्य दलातून बळीराम गीते सेवानिवृत्.

 भारतीय सैन्य दलातून बळीराम गीते सेवानिवृत्.

-------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

-----------------------------

             तालुक्यातील सुभाष नगर येथील भारतीय सैन्य दलातून बळीराम संग्राम गीते हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर त्यांचा लोहा परिसरातील पंचक्रोशीतील नातेवाईक व मित्रमंडळींच्या वतीने तसेच लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रारंभी लोहा शहरातील मुख्य मार्गावरून उघड्या जीपमधून ढोल ताशांचा गजरात मिरवणूक काढण्यात आली.

         याप्रसंगी लोहा पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सपोनि रेखा काळे यांनी भारतीय जवानास पुष्पहार घालून सत्कार केला. याप्रसंगी पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.