Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य तपासणी शिबीरास उत्तम प्रतिसाद.

 आरोग्य तपासणी शिबीरास उत्तम प्रतिसाद.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र

रिसोड  प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर

-----------------------------------

प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवी श्री पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी, निदान व उपचार शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.शिबिरात 795 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

 श्री उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालय येथे शनिवार  दिनांक 4  मे रोजी पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मधुसूदनजी अग्रवाल, माजी खासदार अनंतरावजी देशमुख, उत्तमचंदजी बगडिया व इतर मान्यवर उपस्थित होते.

    याप्रसंगी माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी अग्रवाल बंधूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच त्यांच्या या कार्यामध्ये सोबत असल्याचे सांगितले. मधुसूदनजी अग्रवाल याप्रसंगी बोलताना म्हणाले की ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन चा हा तिसरा कॅम्प असून मागील दोन कॅम्प मध्ये दुर्धर आजाराचे 460 पेशंट वरती यशस्वी उपचार केले असून रोगमुक्त रिसोड चा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. लवकरच रिसोड शहरांमध्ये समता सर्वस्व कॅन्सर सेंटर  शिवाजी चौकातील बगडीया कॉम्प्लेक्स येथे सुरू होत असून यामध्ये अद्यावत डायलिसिस सेंटर, अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब, ऑनलाइन  कौन्सिलिंग सेंटर,, विविध आजारावर  स्पेशलिस्ट डॉक्टरांच्या व्हिजिट  व इतर वैद्यकीय सेवा निशुल्क राहणार आहेत.  रिसोडकरांच्या सेवेत मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल पुरुषोत्तमजी अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये सुरू करत असल्याचे सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये पुरुषोत्तमजी अग्रवाल यांनी कॅन्सर सारख्या दूरधर आजारावरती ममता व मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले तसेच ग्रामीण भागातून गरजू रुग्णांचा शोध घेऊन त्यांना आरोग्य शिबिरापर्यंत आणण्यासाठी आशावर्कर करीत असलेल्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमात आशावर्कर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर रुग्णांची, नी रिप्लेसमेंट, नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली व रुग्णांना  आयुष्यमान आरोग्य कार्ड काढून देण्यात आले.रुग्णांची क्सरे औषध मोफत होते. शिबिरास संभाजीनगर येथील हृदयरोग तज्ञ डॉ. आशिष अग्रवाल, कॅन्सर तज्ञ डॉ. प्रसाद कसबेकर उपस्थित होते.

 निदान झालेल्या सर्व रुग्णांवर संभाजीनगर व संजीवनी ममता हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे उपचार व शस्त्रक्रिया  करण्यात येणार आहेत.

    शिबिराच्या यशस्वीतेसाठी ममता व मधुसून अग्रवाल फाउंडेशनच्या टीमने, उत्तमचंदजी बगडिया महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व समता फाउंडेशनच्या टीमने अथक परिश्रम घेतले. फाउंडेशनचे अध्यक्ष मधुसूदनजी अग्रवाल यांनी शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments