Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोहा तालुका वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पदी प्रमोद संभाजीराव धुतमल.

 लोहा तालुका वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष पदी प्रमोद संभाजीराव धुतमल.

-------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार

-------------------------

लोहा तालुका वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी प्रमोद संभाजीराव धुतमल यांची निवड करण्यात आली आहे.ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रचार व प्रसार वंचित च्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत  


प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी तालुकाध्यक्ष व कार्यकारणी जाहीर केली आहे


     लोहा कंधार तालुक्यात आंबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व कालवश संभाजीराव धुतमल यांनी सामाजिक अस्पृश्यता व न्याया विरुद्ध शेवट प्रयत्न संघर्ष केला आहे.साठ च्या दशकात मागासवर्गीय मुली व मुलांसाठी वसतिगृह काढले त्यातून हजारो विद्यार्थी शिकले घडले .लोहा बसस्थानक जवळील कर्मचारी दादासाहेब गायकवाड नगर बसविले .भारिप बहुजन महासंघाचे जिल्ह्यातील पहिले उपनगराध्यक्ष म्हणून कालवश संभाजीराव धुतमल यांनी पाच वर्ष कार्य केले. .सामाजिक वारसा व चळवळीचा मोठा वैचारिक इतिहास असलेल्या प्रमोद धुतमल यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका लोहा अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे .ऍड बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लोहा तालुक्यात वंचित पक्ष बळकट करण्याची जबाबदरी जिल्ह्यध्यक्ष शिवा शिवा नरंगले यांनी दिली आहे .प्रमोद धुतमल याच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे यापूर्वी त्यांनी भारिप युवा तालुकाध्यक्ष तसेच रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे तरुणांची मोठी फळी त्याच्याकडे आहे .

Post a Comment

0 Comments