Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आजपासून दत्त मंदिरात जगद्‌गुरू श्री तुकोबाराय गाथा परायण सोहळ्याचे आयोजन.

 आजपासून दत्त मंदिरात जगद्‌गुरू श्री तुकोबाराय गाथा परायण सोहळ्याचे आयोजन.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार

------------------------------

          श्री साधु महाराज,सखाराम महाराज,सदगुरु ब्रम्हचारी महाराज,गुरुवर्य श्री प्रभु महाराज कृपेने शहरातील देऊळ गल्ली दत्त मंदिर लोहाच्या वतीने वैशाख शु. ३ शुक्रवार दि.(१०) मे २०२४ ते वैशाख शु. १४ बुधवार (२२) मे २०२४ पर्यंत जगद्‌गुरू श्री तुकोबारायाचे गाथा पारायण १३ दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदरील कार्यक्रमास शहर व परिसरातील भाविक भक्तांनी या पारायणा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

             सदरील गाथा पारायण सोहळ्याचे व्यासपीठ प्रमुख म्हणून प.पु. गुरुवर्य श्री लक्ष्मीकांत प्रभु महाराज लोहेकर,प.पु.भालेराव गुरुजी महागावकर,प.पु.आत्माराम महाराज रायवाडीकर,प.पु.चंद्रकांत महाराज कनकदंडे असल्याची माहिती आयोजकाकडून देण्यात आली.गाथा पारायणाची वेळ सकाळी ७ ते ९ असेल.तसेच वैशाख शु. १४ बुधवार (२२) मे २०२४ रोजी १० ते १२ ह.भ.प. ज्ञानोबा माऊली शिंदगीकर यांचे किर्तन होईल.किर्तनानंनतर महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे प.पु. गुरुवर्य लक्ष्मीकांत प्रभु महाराज लोहेकर दत्त संस्थान, देवालय मंदिर, लोहा यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments