Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मौजे कोरेगाव ता. कराड येथे वार्षिक यात्रेत हातात पिस्टल घेऊन वावरणारे युवकास कराड स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.

मौजे कोरेगाव ता. कराड येथे वार्षिक यात्रेत हातात पिस्टल घेऊन वावरणारे युवकास कराड स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर.

--------------------------------------------

    कोरेगाव तालुका कराड गावचे यात्रेमध्ये हातात पिस्टल घेवून वावरणा-या युवकाकडून एका काडतुसासह पिस्टल हस्तगत केले.

       याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे कोरेगांव, ता. कराड येथे गांवचे वार्षिक यात्रेमध्ये जमलेल्या गर्दीमध्ये एक युवक हातात पिस्टल घेवून वावरत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त झालेली होती, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी सुचना देवून मौजे कोरेगांव, ता. कराड या गांवचे परिसरात पेट्रोलिंग करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.

     दिनांक २५/०५/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पथकाने कार्वे तसेच कोरेगाव तालुका कराड परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळाले बातमी मधील वर्णनाप्रमाणे एक युवक नामे निखिल शशिकांत थोरात वय २५ वर्ष रा. नांदलापूर ता.कराड हा कोरेगाव ता. कराड बाजूकडून येणारे रस्त्याने पायी चालत येत असताना दिसला त्याचा वाजवी संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात ७०००० /- किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस किंमत रु. २०० असा एकूण ७०२०० /- चा मुद्देमाल त्याचे ताब्यात मिळून आल्याने त्या युवकाविरुद्ध कराड तालुका पोलीस ठाणे गुरनं ३४९/२०२४ शस्त्रबंदी अधिनियम (सुधारित) २०१९ चे कलम ३,७,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

     सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपोवेतो ८७ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर बंदूक, १ रायफल, १९७ जिवंत काडतुसे, व ३८५ रिकाम्या पुंगळया, १ रिकामे मॅग्झीन असे जप्त करण्यात आलेले आहेत.

       सदर कारवाई मध्ये समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पो.हवा, विजय कांबळे, संजय शिके, अतीश घाडगे, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील स.पो.नि. अभिजीत चौधरी, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सज्जन जगताप, धनंजय कोळी यांनी सहभाग घेतला, अशा प्रकारे लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कारवाईबाबत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अतुल सबनीस, पोलीस उप अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments