Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जि. प. शाळा बोरखेडीचे "प्रवेशद्वार" गटारातून मुक्त.

 अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जि. प. शाळा बोरखेडीचे  "प्रवेशद्वार" गटारातून मुक्त.

----------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

रणजीत ठाकूर

----------------------------

मागील अनेक वर्षापासून रिसोड तालुक्यातील ग्राम बोरखेडी येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रवेशद्वार गटाराच्या कचाट्यात सापडले होते.शाळेच्या व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने स्थानिकसानिक ग्रामपंचायतला वारंवार तक्रारीरी करूनही ग्रामपंचायत या गंभीर बाबीकडे जाणबुजून दुर्लक्ष करीत होती.ग्राम बोरखेडी येथील सर्व सांडपाणी पाणी व घाण पाणी शाळेच्या प्रवेशद्वारावर येऊन साचत असल्याने या प्रवेशद्वाराला तलावाचे व गटाराचे स्वरूप आले होते त्यामुळे शाळेत इजा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना या साचलेल्या गटाराचा अतोनात त्रास होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागील भागातून अडचणीतून मार्ग काढला होता.अडचणीतून काढलेल्या मार्गावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने विद्यार्थ्यासह शिक्षकांना  शाळेत ये-जा करणे अवघड झाले असल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने तात्काळ जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारावरील गटार व तलाव जेसीबीच्या साह्याने उपसून तेथे सर्व जागा स्वच्छ करण्यात आली.अनेक वर्षानंतर जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वाराची घाण गटारातून व तलावातून मुक्तता झाल्यामुळे शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments