Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गडमुडशिंगीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या.

 गडमुडशिंगीत एकाची गळफास घेऊन आत्महत्या.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-----------------------------------

2 :- गडमुडशिंगी ता. करवीर येथील रणजीत राजेंद्र पोवार (वय 40 रा.गडमुशिंगी,ता करवीर) यांनी घरातील लाकडी तुळईस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी रंणजीत हा मनमिळावू स्वभावाचा होता. सकाळी घरातील कामे आटोपून तो घरातील दुसऱ्या माळ्यावर गेला. बराच वेळ जेवायला आला नाही म्हणून. पुतण्या अनिरुद्ध पोवार हा बोलावयास गेला होता .त्यावेळी रणजीत यांनी घरातील लाकडी तुळईस गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी वडील राहुल पोवार यांना बोलावून रंणजीत यांना उपचारासाठी गांधीनगर वसाहत रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याला उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर ला पाठवण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. रणजीत ने केलेल्या आत्महत्ये मुळे गांधीनगर आणि गडमुडशिंगी परिसरात हळहळ व्यक्त होत होती. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप दळवी करत आहेत.


मयत रंणजीत पोवार

Post a Comment

0 Comments