Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शेळेवाडी चोरी प्रकरणातील तीन आरोपींना अटक करून 73 हजार दोनशे रुपये मध्य मुद्देमाल जप्त ,स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

 शेळेवाडी चोरी प्रकरणातील तीन आरोपींना अटक करून 73 हजार दोनशे रुपये मध्य मुद्देमाल जप्त ,स्थानिक गून्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

---------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकरे

---------------------------------------

राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील सखाराम फर्निचर भांडी दुकानांमध्ये अज्ञात चोरट्याने 73 हजार दोनशे रुपये चा मुद्देमाल चोरून नेला होता या प्रकरणी स्थानिक गून्हे अन्वेषण शाखाव राधानगरी पोलिसांनी  आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील  73 हजार दोनशे रुपये चा मुद्देमाल जप्त  करण्यात आला असून त्या तिघां चोरट्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली.


याबद्दल चोरीची आधीक माहिती अशी की,

 राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील सखाराम फर्निचर भांडी दुकान या दुकानांमध्ये तांब्याचे भांडी अशा अनेक वस्तू मुकेश गणपती जाधव राहणार इचलकरंजी मुळगाव माधवनगर सांगली उमेश गणपती गोसावी राहणार इचलकरंजी अभिषेक विलास घाडगे राहणार इचलकरंजी या तिघांच्या कडून 73 हजार दोनशे रुपये रुपयाचा मुद्देमाल जप्त करून या तीन आरोपींच्यावर भादवि 454 457 380 34 प्रमाणे गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली असून अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कृष्णात खामकर हे करीत आहेत

Post a Comment

0 Comments