Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विनापरवाना बॉक्साईट सदृश्य मातीची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त...राधानगरी तहसीलदाराची कारवाई.

 विनापरवाना बॉक्साईट सदृश्य मातीची वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त...राधानगरी तहसीलदाराची कारवाई.

----------------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

----------------------------------------

राधानगरी तालुक्यातील तळगाव येथील बॉक्साईट सदृश्य मातीची विनापरवाना भरलेले -तीन ट्रक जिल्हा खणीकर्म अधिकारी व महसूल विभाग राधानगरी यांच्या संयुक्त सहकार्याने रात्रीचे गस्त घालत असताना पकडण्यात आले असून अंदाजे दहा लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा खनिकर्म अधिकारी व महसूल विभाग राधानगरी हे शुक्रवारी रात्री गस्त घालत असताना या पथकांना ट्रक त् नंबर KA- 56 -0204,KA-22-c-9402, AT- 16-TY-८५७५ हे तीन ट्रक विनापरवाना बॉक्साईट सदृश्य मातीची वाहतूक करत असताना पकडून तीन ट्रक ताब्यात घेऊन ते राधानगरी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले असून सदर ट्रकचे मालक मुजावर शेख बेळगाव यांच्या मालकीचे आहेत. यासंबंधी जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंदा पाटील, लक्ष्मण गावडे, शिवाजी पाटील, मंडळ अधिकारी गीते, कोतवाल संदीप टिपूगडे यांनी पंचनामा केला असल्याची माहिती राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली.


Post a Comment

0 Comments