Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथील तहसील कार्यालयात मतदार नाव नोंदणी सुधारणा कार्यशाळेचे आयोजन.

 रिसोड येथील तहसील कार्यालयात मतदार नाव नोंदणी सुधारणा कार्यशाळेचे आयोजन.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

 रिसोड प्रतिनिधी

 रणजीत ठाकूर 

----------------------------------

रिसोड : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी

प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 27 जून रोजी सकाळी 11 वाजता रिसोड तहसील कार्यालयाच्या सभागृहात बीएलओ व पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी (महसूल) वैशाली देवकर, तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील मतदार यादी 25 जून ते 25 जुलै या कालावधीत अद्ययावत केली जाईल, 25 जुलै रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, 20 ऑगस्ट रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेली अनियमितता पाहता सर्वांनी सतर्क राहून त्यात कोणाचे नाव आहे की नाही हे तपासावे. जर नसेल तर या कालावधीत केवळ अपडेटसाठी फॉर्म क्रमांक 8 भरावा. अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी उपस्थित बीएलओ पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सांगितली. यावेळी तहसील, बीएलओ यांच्यासह रिसोड शहरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments