Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बीड लोकसभा निकालाचे तालुक्यात सोशियल मीडियावर पडसाद.

 बीड लोकसभा निकालाचे तालुक्यात सोशियल मीडियावर पडसाद.

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड तालुका प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकुर

----------------------------------

मराठा विरुद्ध वंजारी अशा राजकीय पोस्ट.लकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेल्या जगातील सर्वात मोठ्या देशाची म्हणजे भारत देशाची लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली. सलग सात टप्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी 4 जूनला होऊन निकाल लागले आणि आपल्या मित्र पक्षाच्या सहकार्याने नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदी रुजू होणार हे निश्चित झाले. भाजपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेस आणि मित्र पक्षाची कामगिरी वरचढ राहली. महाराष्ट्रात सुद्धा भाजपा विरोधी संताप मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केला आणि महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद दिला.

 महाराष्ट्रातील स्थानिक प्रश्नाचा फटका भाजपला बसला आणि त्यामध्ये भाजपच्या काही नेत्यांना हार पत्कारावी लागली.

 केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजाताई मुंढे, सुधीर मुनगंटीवार या काही प्रमुख नेत्यांचा पराजय झाला. बीड लोकसभा मतदार संघात अनेक वर्षांपासून मुंढे कुटुंबाचा राजकीय दबदबा असताना आणि पंकजामुंढे आणि धनंजय मुंढे एकत्र असताना अगदी नवख्या बजरंग सोनवणे यांनी ताईंना मात दिली.हा पराभव मुंढे समर्थक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. मराठवाड्यात जरंगे पाटलाचा फॅक्टर बजरंग बाप्पाला फायद्याचा ठरल्याची चर्चा सर्वत्र आहे. या फॅक्टर मुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते संपूर्ण राज्यभर ऍक्टिव्ह झाले आणि बाप्पाच्या समर्थनार्थ सोशियल मीडियावर टिप्पनी करुन पंकजा ताईंना मात दिल्याचा आनंद व्यक्त करताना.भाजपा पेक्षाही वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन परस्परविरोधी पोस्ट करण्यात आल्या. निवडणूक संपली परंतु त्याचे समाजद्वेषी सामाजिक पडसाद उमटतील अशी कोणतीही आक्षेपार्ह कृती होणार नाही याची काळजी सोशिएल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्यानी घेतली पाहिजे.

बीड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी त्यांच्या पुरती घेतलेली भूमिका आहे. मतदारांनी दिलेला कौल पंकजाताई मुंढे यांनी अतिशय मोठया मनाने स्वीकारला आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा जनमताचा आदर राखावे असे आवाहन केले. परंतु काही कार्यकर्ते जाणीवपूर्वक सोशिएल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून जनभावना दुखविण्याचं काम करित आहेत. सोशिएल मीडियावरील परस्परविरोधी पोस्ट बंद करावे अन्यथा प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

Post a Comment

0 Comments