Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पॉवर हाऊस ते तिरुपती नगर रस्त्यावरील अतिक्रमण हटवीण्याची मागणी.

 पॉवर हाऊस ते तिरुपती नगर रस्त्यावरील अतिक्रमण हटवीण्याची मागणी.

------------------------------------

रिसोड प्रतिनिधी

 रणजीत  ठाकूर

------------------------------------

100 फुटाचा रस्ता उरला 15 फुट.

 -शहराच्या विकासासाठी रस्त्यावरील अतिक्रमण सर्वात मोठा अडथळा ठरले आहे. रिसोड शहराचा मागील पंधरा वर्षात मोठा विस्तार झाला आहे. विस्तारित शहरात अनेक नागरी वस्ती निर्माण झाल्या आहेत. त्यामध्ये शिवाजी नगर परिसरात इतर अनेक नगराची निर्मिती झाली आहे.ज्यामध्ये अष्टविनायक नगर, जिजाऊ नगर, माऊली नगर,बालाजी नगर, हबीब कॉलनी व तिरुपती नगर इत्यादी एन.ए ले आउट झालेले नगर आहेत. या सर्व नगरवासियांनी मोठमोठी घरे तर बांधली मात्र घराकडे जाण्यासाठी कोणताच रस्ता उपलब्ध नाही.जो रस्ता   विकास आराखड्यात नोंदविला आहे ज्याची लांबी जवळपास शंभर फूट आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही ठिकाणी हा रस्ता केवळ 15 फुटाचा शिल्लक राहला आहे. वाशीम रोडवरील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कार्यालय (पॉवर हाऊस)  

पासून तिरुपती नगर कडे जाणारा हाच तो रस्ता आहे. या अतिशय महत्वाच्या विकास आराखड्यात मान्यता मिळालेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून तो रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी रस्त्याची आवश्यकता असणाऱ्या सर्वच नगरातील नागरिकांनी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडे निवेदणाद्वारे केली आहे. विस्तारित शहराच्या विकासाला अडसर ठरत असलेले रस्त्यावरील अतिक्रण तहसीलदार तथा संबंधित प्रशासन काढेल असा आशावाद नागरिकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments