Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सांगलीत काँग्रेस पक्षाकडून चिखल फेक आंदोलन बेरोजगारी विरोधात काँग्रेस आक्रमक भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.

 सांगलीत काँग्रेस पक्षाकडून चिखल फेक आंदोलन बेरोजगारी विरोधात काँग्रेस आक्रमक भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मिरज कुपवाड प्रतिनिधी 

राजू कदम 

-------------------------------

राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महा भ्रष्ट युती सरकार त्याकडे जाणीवपूल
लक दुर्लक्ष करत आहे या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे 

या महा भ्रष्ट निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज प्रतिकात्मक स्वरूपात तिघाडी सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून चिखल फेक आंदोलन करीत भाजपा प्रणित सरकारचा निषेध केला .

राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी कष्टकरी ,दलित, अल्पसंख्याक, महिला ,तरुण ,गरीब, व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा फुले ,व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ,यांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे याचा आम्ही तीव्र निषेध करीत आंदोलन करण्यात आले 

मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांच्यासह बहुसंख्या कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments