Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. गांजाचा साठा करुन ठेवणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. गांजाचा साठा करुन ठेवणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक.

-----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------------

पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थाचे सेवन, खरेदी, विक्री व साठा करणा-या साठेकर्राचा शोध घेवुन अंमली पदार्थ विरूध्द कठोर कारवाई करुन अंमली पदार्थाचा कोल्हापूर जिल्हयातुन समुळ नेस्तनाबूत करण्यासाठी  रविंद्र कळमकर पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ.शाखा, कोल्हापूर यांना मुखशिल आदेश दिले होते.


त्या मुखशिल आदेशानुसार  पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांनी कार्यालयीन पोलीस अंमलदार यांना कोल्हापूर जिल्हया मध्ये कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ खरेदी, विक्री, सेवन व साठा करणा-या लोकांचा

शोध घेवुन त्यांचे विरूध्द एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत सक्त कारवाई करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार परवा दि.२७/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील पोलीस हवालदार महेश गवळी यांना त्यांचे गोपनीय माहितीदारा व्दारे खात्रीशीर माहिती मिळाली ती अशी की, पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी दिलदार चौगोंडा कांबळे रा. माळ भाग, उमलवाड, ता. शिरोळ याने त्याचे राहत्या घराच्या पाठीमागे त्यांच्या नातेवाईकाचे मालकीच्या खोलीमध्ये गांजा या अंमली पदार्थाचा मोठया प्रमाणात साठा करुन ठेवला असल्याची  खात्रीशीर माहिती मिळाली होती.


सदर माहिती च्या अनुषंगाने  पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक सत्यवाहन हाके, जयसिंगपूर पोलीस ठाणे यांनी छापा प्रभारी म्हणुन कार्यवाही करून स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उप निरीक्षक संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार महेश गवळी, खंडेराव कोळी, विजय गुरखे, अमित सर्जे, विनायक चौगुले, समीर कांबळे, महेश खोत, शिवानंद मठपती, आयुब गडकरी, महादेव कुराडे, सुशिल पाटील यांचेसह माळ भाग, उमलवाड गांवामध्ये सापळा लावुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार दिलदार चौगोंडा कांबळे वय वर्षे - ४६, रा. उमलवाड, माळ भाग, ता.शिरोळ, कोल्हापूर यास छापा टाकुन पकडले असुन त्याचे ताब्यातुन सुमारे एकुण ७ किलो ३०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ सुमारे १८००००/- रू किमतीचा गांजा व गुन्हयातील इतर साहीत्य असा एकुण १९००००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर बाबत जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा अधिक तपास जयसिंपूर पोलीस ठाणे करीत आहे.


सदर आरोपी दिलदार चौगोंडा कांबळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन, त्यांच्या विरोधात यापुर्वी अंमली पदार्थ कायद्या अंतर्गत जयसिंगपूर, शिवाजीनगर व जुनाराजवाडा पोलीस ठाणे येथे एकुण ४ गुन्हे दाखल आहेत

Post a Comment

0 Comments