Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती,सासू व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल,

 विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती,सासू व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल, 

----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

गांधीनगर प्रतिनिधी

शशिकांत कुंभार

----------------------------------

माहेरहून लग्नात झालेल्या खर्चापोटी तीन लाख रुपये घेऊन ये आणि मुलाच्या बारशात पाहुण्यानी घातलेले दागिने आणलेस तरच तुला नांदवणार अशी धमकी देत  विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ व शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची तक्रार रोहिणी विश्वजीत सोनुले वय 26 रा. गडमुडशिंगी ता.करवीर सध्या राहणार विचारे माळ कोल्हापूर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. यावरून पती विश्वजीत विकास सोनुले,सासू शोभा विकास सोनुले, व सासरे विकास सदाशिव सोनुले सर्व राहणार गडमुडशिंगी यांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

सासरच्या मंडळीकडून मुलगा गुरांचा डॉक्टर असे सांगितले होते मात्र प्रत्यक्षात   माझी फसवणूक झाली आहे. ७ जानेवारी २०२१ ला लग्न झाले. लग्ना अगोरपासूनच पती विश्वजीत याना दारूचे व्यसन आहे. ते रोज रात्री अपरात्री नशेत येऊन मारहाण करीत असतो.सासरे विकास सोनुले आणि सासू  आपल्या मुलांचीच बाजू घेवून छळ करतात. माहेरहुन लग्नात आम्ही तीन लाख रुपये खर्च केले आहेत ते तुझ्या घरच्याकडून घेऊन ये अशी धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत. अशी फिर्याद पीडित महिलेने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रूपाली कांबळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments