गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाची उघडझापामुळे पिकाचे नुकसान होणार पडला शेतकरी वर्गाला प्रश्न.
गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाची उघडझापामुळे पिकाचे नुकसान होणार पडला शेतकरी वर्गाला प्रश्न.
--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे.
--------------------------------------
राधानगरी.यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता मात्र अद्यापही याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. पावसाची सतत धार नसल्याने खरीप हंगामातील पिकांच्या रोपणीसाठी लोकांना वाट बघावी लागत आहे..महाराष्ट्रात ठीक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असला तरी खरीप पिकासाठी लागणारी पावसाची सतत धार पाहायला मिळत नाही. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाची उघडझाप मुळे पिकांचे नुकसान होणार काय हा एक प्रश्नच शेतकरी वर्गाला पडला आहे.. जूनच्या अखेरीस लोकांची रोप लावण्याची घाई असते मात्र भात पिकाला जास्त पावसाची गरज असल्याने अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी रोप लावणी चालू आहे तर ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत आहे
Comments
Post a Comment