Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प.

 अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने वाहतुक ठप्प.

-----------------------------------

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

 आनंदा तेलवणकर

-----------------------------------


शाहुवाडी : - अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने  रस्ता बंद झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन दरड हटवण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे

कोकण पट्यात सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अणूस्कूरा घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.

कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा घाट म्हणून अनुस्कुरा घाटाची ओळख आहे, पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ही दरड हटवण्यासाठी तातडीने घटनास्थळी एक जेसीबी पाठवला असुन दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर सुरु केले आहे

Post a Comment

0 Comments