निवडे सरपंचांचा ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार - लक्ष्मण तांदळे
निवडे सरपंचांचा ग्रामपंचायत मध्ये मनमानी कारभार - लक्ष्मण तांदळे
--------------------------------------
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
कोतोली प्रतिनिधी
पांडुरंग फिरगें
--------------------------------------
निवडे ता. पन्हाळा निवडे येथील मागासवर्गीय, हरिजन बेगर वसाहतीमध्ये आरसीसी सिमेंट काँक्रीटच्या सन 2021/ 22 रस्त्याचा गैरवापर तर मागासवर्गीय, दलित एकही कुटुंब ज्या ठिकाणी रहात नाही त्या ठिकाणी आरसीसी काँक्रीट रस्ता करण्यात आला आहे. सदरचा रस्ता स्वतः च्या स्वार्थासाठी व स्वतःच्या शेतीकडे जाण्यासाठी निवडे गावचे सरपंच उज्वला सुतार यांनी केला असल्याचे युवा लहुजी संघर्ष सेनेचे अध्यक्ष लक्ष्मण तांदळे यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.
दलित वस्ती साठी काँक्रिटी रस्ता करण्यासाठी तीन लाख 99 हजार 526 रुपये हा निधी दलित वस्तीसाठी आला होता. पण दलित वस्तीमध्ये हा रस्ता न करता स्वतःच्या शेतीसाठी निवडे गावचे सरपंच .उज्वला सुतार यांनी निधीचा केला गैरवापर!
ग्रामपंचायतीच्या विविध कामात गैरवापर केला असून
या प्रकरणाची सखोल चौकशी सीईओ जि. प.कोल्हापूर व पंचायत समिती पन्हाळा बी .डि.ओ यांनी तात्काळ चौकशी करून त्यांना पदावरून पदमुक्त करण्यात यावे व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे तांदळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment