रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघात भाजपचा बोलबाला.येणाऱ्या विधानससाठी शुभसंकेत.

रिसोड-मालेगाव विधानसभा मतदार संघात भाजपचा बोलबाला.येणाऱ्या विधानससाठी शुभसंकेत.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड/तालुका प्रतिनिधी

 रणजीत सिंह ठाकूर 

----------------------------------------

..अकोला लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यासाठी काही संकेत दिले आहेत.लोकसभा निकालापूर्वी रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघातील मतदार कोणाच्या बाजूने उभा राहील याविषयीं अनेक तर्क वितर्क मांडले जात होते. बऱ्याच राजकीय विश्लेष्कानी स्थानिक आमदार काँग्रेस पक्षाचा असल्यामुळे काँग्रेस चे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना या विधानसभेत मताधिक्य मिळेल असे वाटले होते.तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी रिसोड मालेगाव मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. बाळासाहेब आंबेडकर सह त्यांचा परिवार पत्नी अंजलीताई आंबेडकर आणि मुलगा सुजात आंबेडकर हे सातत्याने सर्कलनिहाय या मतदार संघात येऊन गेल्यामुळे आंबेडकर एक नंबरची मते घेतील असा अंदाज काही विश्लेष्कानी व्यक्त केला होता.तर भाजपचे सलग चार वेळा खासदार असणारे संजय धोत्रे यांनी नेहमीच रिसोड मतदार संघ दुर्लक्षित ठेवला आणि पुन्हा परिवारवाद जोपासत भाजपने पुन्हा त्याच्या मुलाला म्हणजे अनुप धोत्रेना उमेदवारी दिल्यामुळे मतदार भाजपाची साथ सोडतील असे वाटत असताना मात्र 4 जूनला लागलेल्या निकालात भाजप आणि काँग्रेस च्या लढतीत अनुप धोत्रे अंतिम क्षणी विजयी झाले आणि रिसोड मालेगाव तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे अंदाज सबसेल चुकले. रिसोड विधानसभा क्षेत्रात अनुप धोत्रे यांना सहा विधानसभा मतदार संघांपैकी अकोला पूर्व नंतर सर्वाधिक मते 80232 एवढी मते रिसोड मतदार संघात मिळाली तर त्यांचे

 प्रतिस्पर्धी काँग्रेस चे डॉ अभय पाटील यांना 72150 मते मिळाली.तर या दोघांच्या तुलनेत खूप मागे पडलेले ऍड बाळासाहेब आंबेडकर यांना केवळ 39415 मते मिळाली. या निकाळामुळे भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यासाठी शुभसंकेत आहेत. भाजपाच्या मतदाराने अतिशय चुरशिच्या लढतीत साथ न सोडता भाजपचा विजय खेचून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.मतधिक्यामुळे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला आहे. काही महिन्यात विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा अटीततीची होणार हे नक्की.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.