राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन.संभाजी ब्रिगेड च्या वतीने अभिवादन.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन.संभाजी ब्रिगेड च्या वतीने अभिवादन.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------------
दीन-दलित आणि शोषित वर्गाचे तारणहार राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. छत्रपती शाहू महाराजांनी 28 वर्षे कोल्हापूरचा कारभार पाहिला. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक सुधारणा घडवून आणल्या. आपल्या राज्यात मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. तसेच वैदिक शाळांची स्थापना देखील केली. संस्कृत शिक्षणाचा प्रचार केला. धर्मग्रंथ शिकण्यास सर्व जातीतील विद्यार्थांना प्रेरित केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिसोड येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करण्यात आले असून सर्वप्रथम शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला अनेक मान्यवरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला. प्रसंगी संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील खरात तालुकाध्यक्ष रुपेश पाटील बाजड नावली गावचे सरपंच गजाननराव बाजड कैलास पाटील माळेकर गणेशपूरचे सरपंच विष्णू जाधव संदीप पाटील डॉ सागर बाजड बबन रंजवे विवेकानंद ठाकरे दत्तराव बाजड हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पाटील बाजड यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्जुन पाटील खरात यांनी मानले..
Comments
Post a Comment